'परमपूज्य भिडे गुरुजी कुठे आहेत'

'परमपूज्य भिडे गुरुजी कुठे आहेत'

पुणे : राज्यभरात मुसळधार पाऊस बरसत आहे. कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. त्यानंतर आता संभाजी भिडे हे सध्या कुठं आहेत, अशा स्वरुपाचे ट्विट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे. 

सांगली, कोल्हापुरातील बहुतांश भागात मुसळधार पावसामुळे पूर आला आहे. त्यामुळे अनेकांचे घरातून स्थलांतर करण्यात आले आहे. प्रशासनासह एनडीआरएफच्या जवानांकडून मदतकार्य सुरु करण्यात आले आहे. त्यानंतर आता याच मुद्द्यावरून आव्हाड यांनी ट्विट करत शिवप्रतिष्ठानचे संभाजी भिडे यांच्याबाबत वक्तव्य केले.

यामध्ये त्यांनी लिहिले, की सांगलीत पूर, जगभरातून मदत येते आहे. सहज आठवले परमपूज्य भीडे गुरुजी कुठे आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com