कोणत्या मंत्र्याला कोठे मिळणार बसण्यासाठी दालन

mantralya-mumbai
mantralya-mumbai

मुंबई - राज्यात नव्याने स्थापन झालेल्या मंत्रिमंडळात सध्या सहा मंत्र्यांची निवड करण्यात आली. या मंत्र्यांना कोणती दालने मिळणार याबाबत उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारी असलेल्या दालनात कोणताच मंत्री बसण्यास तयार नसल्याने सध्यातरी ६ व्या मजल्यावर फक्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे दालन राहणार आहे.

मंत्रालयाच्या मुख्य इमारतीला आग लागल्यानंतर त्याचे नूतनीकरण करण्यात आले. इमारतीच्या नूतनीकरणानंतर मुख्यमंत्र्यांच्या दालनाशेजारील दालन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात आले होते. मात्र कालांतराने अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांना देण्यात आले होते. या सरकारला वर्ष, दीड वर्षाचा कालावधी होताच खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. त्यांच्यानंतर पांडुरंग फुडकर यांनी कृषिमंत्री म्हणून हे दालन स्वीकारले, मात्र त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर हे दालन नवे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना देण्यात आले. त्यांचा तर विधानसभेच्या निवडणुकीत पराभव झाला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या मंत्र्यांमध्येही ६व्या मजल्यावरील मुख्यमंत्र्यांच्या शेजारील दालन नको, अशीच भूमिका घेतल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागातील एका उच्चपदस्थ अधिकाऱ्याने सांगितले.

विद्यमान परिस्थितीत मुख्य इमारतीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ६व्या मजल्यावर दालन राहणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा मंत्री जयंत पाटील यांनी विस्तारीत इमारतीतील ६व्या मजल्यावरील, छगन भुजबळ यांना मुख्य इमारतीतील दुसऱ्या मजल्यावर, एकनाथ शिंदे यांना विस्तारीत इमारतीतील तिसऱ्या मजल्यावर, मंत्री सुभाष देसाई यांना ५व्या मजल्यावर, काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांना विस्तारीत इमारतीतील पहिल्या मजल्यावर आणि काँग्रेस मंत्री डॉ. नितीन राऊत यांना मुख्य इमारतीतील चौथ्या मजल्यावर दालन देण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com