मोठी बातमी देणारे हे 'सुत्र' आहेत तरी कोण ?

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

सत्तास्थापनेचा घोळ राज्यात सुरु असताना मात्र दिवस रात्र प्रत्येक घडामोंडीवर लक्ष ठेवून आहे त्या म्हणजे वृत्तवाहिन्या ! दरम्यान सर्वात आधी 'मोठी बातमी' देणार कोण याचीच शर्यत टिव्हीवर पाहायला मिळतेय.

मुंबई : शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येऊन कधीही सत्तास्थापनेचा दावा करून बहुमत सिद्ध करू शकते. असा सत्तास्थापनेचा घोळ राज्यात सुरु असताना मात्र दिवस रात्र प्रत्येक घडामोंडीवर लक्ष ठेवून आहे त्या म्हणजे वृत्तवाहिन्या ! दरम्यान सर्वात आधी 'मोठी बातमी' देणार कोण याचीच शर्यत टिव्हीवर पाहायला मिळतेय. मात्र राज्यातील सर्वच घडामोडींचे तपशील देणार हे 'सुत्र' आहेत तरी कोण असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. 

Image may contain: 3 people

याचसंदर्भातील एक मजेशीर फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायर होत आहे.  ज्यामध्ये राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांना भेटायला गेलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार दिसत आहेत. तर, त्यांच्या मागे सुरक्षा रक्षक उभे आहेत. हेच वृत्तवाहिन्यांचे सुत्र आहेत असं या फोटोंमध्ये लिहिलं आहे. सध्या हा मजेशीर फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायर होताना दिसतोय. 

Image may contain: 2 people, text

एवढचं काय तर गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीजियावर चालु असलेल्या सरकार स्थापनेच्या एकुणच परिस्थितीवर अनेक जोक्स, मीम्स आणि मजेशीर व्हीडिओ व्हायरल होताना दिसत आहेत. सरकारस्थापनेचा हा तिढा कधी सुटणार याकडे सर्वांच लक्ष लागून आहेच मात्र सोशल मीडियावरील मीम्स आर्मीही यामध्ये कुठेच मागे नाही. 

Image may contain: text

Image may contain: 1 person, text

महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी दिलेल्या मुदतीत भाजप आणि शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी आवश्‍यक संख्याबळ गोळा करता न आल्याने राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी सोमवारी (ता. 11) रात्री राज्यातील तिसरा मोठा पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिले. त्यांना आज (मंगळवार) रात्री साडेआठपर्यंत मुदत दिली आहे. तोपर्यंत त्यांना आवश्‍यक ते संख्याबळ गोळा करावे लागणार आहे. राज्यातील जनतेचे याकडे लक्ष लागले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Who are the actual sources beahind breaking news