१०, १२वीच्या विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा हिंदुस्थानी भाऊ आहे तरी कोण? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Who is Hindustani Bhau

१०, १२वीच्या विद्यार्थ्यांना चिथावणी देणारा हिंदुस्थानी भाऊ आहे तरी कोण?

मुंबई : हिंदुस्थानी भाऊ (Hindustani Bhau) नावाच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचं आवाहन करण्यात आलं. त्यानंतर आज सकाळी विद्यार्थी अचानक रस्त्यावर (10th 12th Student Agitation) उतरले. नागपूर, अकोला, पुणे, मुंबईत आंदोलन करण्यात आले. पण, हा हिंदुस्थानी भाऊ नेमका आहे तरी कोण?

हेही वाचा: मुंबई : १०, १२ वीच्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनात हिंदुस्थानी भाऊ सहभागी

हिंदुस्थानी भाऊ नेमका कोण? -

हिंदुस्थानी भाऊचं खरं नाव विकास फाटक आहे. तो सोशल मीडियावर हिंदुस्थानी भाऊ म्हणून प्रसिद्ध आहे. विकास फाटक हा युट्यबर म्हणून देखील प्रसिद्ध आहे. तो बीग बॉसच्या १३ व्या पर्वात देखील सहभागी झाला होता. त्याच्या शिवराळ भाषेमुळे २०१६ मध्ये पहिल्यांदा तो प्रकाशझोतात आला होता. त्याचे व्हिडिओ प्रचंड व्हायरल झाले. तसेच तो पाकिस्तान आणि इतर विरोधकांना आक्षेपार्ह भाषेत आव्हान देऊन प्रसिद्धीझोतात राहण्याचा प्रयत्न करत असतो.

विद्यार्थ्यांना इंस्टाग्रामवरून पाठवले मेसेज -

हिंदुस्थानी भाऊनं सोशल मीडियावरून विद्यार्थ्यांना आंदोलन करण्याचं आवाहन केलं. तसेच विद्यार्थ्यांना इंस्टाग्रामवरून मेसेज पाठवले. तसेच तो मुंबईतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनात देखील सहभागी झाला होता. त्यानंतर मुंबई पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पण, या आंदोलनाला सरकार जबाबदार असल्याचा आरोप त्यानं केला आहे. सरकारने विचार केला असता तर विद्यार्थी रस्त्यावर उतरले असते का? कारण गेले तीन महिने ट्विटरला ट्रेंड होता. मुलांनी विनंती केली होती, की ऑनलाइन परीक्षा घ्या. ऑफलाईन परीक्षा घेऊन विद्यार्थ्यांसोबत का खेळतात? असा सवाल त्यानं विचारला आहे.

हिंदुस्थानी भाऊनं व्हिडिओमध्ये नेमकं काय म्हटलं? -

दोन वर्षात कोरोनामुळे मृत्यू झाले आहेत. यामध्ये विद्यार्थ्यांचे देखील मृत्यू झाले आहेत. या धक्क्यातून कुटुंब अजून सावरलेलं नाही. आता ओमिक्रॉन आला आहे. स्वतः सरकार म्हणतेय की घरात राहा, काळजी घ्या. मग सरकार विद्यार्थ्यांचा बळी का देत आहे? प्रोफेसर ऑनलाइन बैठक घेत आहेत. तुम्हाला तुमच्या जीवाची काळजी आहे, तर विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ का? असा सवाल हिंदुस्थानी भाऊनं त्याच्या व्हिडिओमधून केला आहे.

Web Title: Who Is Hindustani Bhau Participate In Student Agitation To Cancel Exam

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :exam10th exam
go to top