डॉ. दाभोलकर, पानसरे हत्येमागे मेंदू कोणाचा?

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 22 ऑगस्ट 2018

मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकर, कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा कट कुणी रचला, त्यामागे मेंदू कोणाचा आहे, याचा शोध सरकारने घ्यावा आणि त्याच्या खोलापर्यंत पोचावे, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली.

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा तपास पाच वर्षे लावता आला नाही. गौरी लंकेश, एम. एम. कलबुर्गी यांच्या हत्येतील आरोपी सापडल्यानंतर आणि शेजारच्या राज्याने माहिती पुरवल्यानंतर मारेकरी पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले आहे.

पाच वर्षांत महाराष्ट्र पोलिसांना या खून सत्राचे धागेदोरे का सापडले नाहीत, असा सवालही जयंत पाटील यांनी केला. सनातनवर बंदी आणावी, असा प्रस्ताव केंद्राकडे अगोदरच पाठवलेला आहे; परंतु त्या वेळी सनातन एवढ्या हत्या करू शकते हे माहीत नव्हते, असे ते म्हणाले. 

Web Title: Who is the mastermind behind Dabholkar, Pansare killings