ओला-उबरसारख्या कंपन्या हिंदूंना नोकरी का देत नाहीत? नितेश राणेंचा सवाल

Nitesh Rane on OLA Ubber, Nitesh Rane News
Nitesh Rane on OLA Ubber, Nitesh Rane Newsesakal

मुंबई: नितेश राणे आपल्या रोखठोक भूमिकेसाठी प्रसिद्ध आहेत. ते आपल्या ट्विटरवरुन वेगवेगळ्या पद्धतीचे खोचक ट्विट्स करत असतात. विरोधकांवर टीका करताना अत्यंत टोकदार भाषेत बोलत असतात. त्याच नितेश राणेंनी आता ओला-उबरबाबत असलेला आपला संशय व्यक्त केला आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय की, ओला-उबरमध्ये बहुतेक चालक हे हिंदू नाहीयेत आणि हे सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. (Nitesh Rane)

Nitesh Rane on OLA Ubber, Nitesh Rane News
पुण्यात मनसे गारद... तीन दिवसात तिसरा राजीनामा!

नितेश राणे यांनी ट्विट करत काही प्रश्न उभे केले आहेत. त्यांनी म्हटलंय की, ओला, उबर सारख्या कंपन्या हिंदूंना नोकरी का देत नाहीत? त्यामागची नेमकी कल्पना काय आहे? त्यांचे बहुतेक चालक हिंदू नाहीत, हे मुंबईकरांच्या लक्षात आले आहे का...? हा सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक नाही का? असा सवाल त्यांनी केला आहे. पुढे त्यांनी म्हटलंय की, खूप उशीर होण्याआधीच आपल्याला काहीतरी करण्याची आवश्यकता आहे! (Nitesh Rane on OLA Ubber)

Nitesh Rane on OLA Ubber, Nitesh Rane News
‘खासगी कंपन्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे गंभीरपणे पाहावे’

‘खासगी कंपन्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे गंभीरपणे पाहावे’

अलिकडेच ओला, उबर यांसारख्या ॲपधारक खासगी कंपन्यांनी ग्राहक तक्रार निवारणाकडे गंभीरपणे पाहायला हवे, असा सूचक सल्ला मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. प्रादेशिक परिवहन विभागाकडून तात्पुरते परवाने देताना निर्धारित नियमावलीचे या कंपन्यांकडून काटेकोरपणे पालन होत आहे की नाही, यावर लक्ष ठेवा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com