‘मी पुन्हा येईन’! आमदारांना वाटतेय का ईडीची भीती?

सत्ता आपलीच येणार असल्याने ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुस्तकातच बंद करून ठेवावा लागला. सर्वांनी भाजपची विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली. पण, सक्षम विरोधक म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला विविध मुद्द्यांवरून विशेषत: भ्रष्टाचाराच्या विषयावरून जेरीस आणले. तरीही, ईडीच्या कारवाईवरून आता राजकारण तापले आहे.
Enforcement Department
Enforcement Departmentesakal

सोलापूर : भाजपसोबतची मैत्री संपवून शिवसेनेने पारंपारिक विरोधक असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेससोबत सत्ता स्थापन केली. सत्ता आपलीच येणार असल्याने ‘मी पुन्हा येईन’ हा डायलॉग माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुस्तकातच बंद करून ठेवावा लागला. सर्वांनी भाजपची विशेषत: माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची खिल्ली उडविली. पण, सक्षम विरोधक म्हणून त्यांनी महाविकास आघाडीला विविध मुद्द्यांवरून विशेषत: भ्रष्टाचाराच्या विषयावरून जेरीस आणले. तरीही, ईडीच्या कारवाईवरून आता राजकारण तापले आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या मेव्हण्यासह खासदार संजय राऊत, प्रताप सरनाईक यांच्यासह राज्यातील अनेक मातब्बर नेत्यांवर अशाप्रकारची कारवाई झाल्याने जिल्ह्यातील आमदारांनी भाजपविरोधात बोलताना सावधगिरी बाळगत घेत आपण गप्प बसलेलेच बरं, अशी भूमिका घेतल्याची चर्चा सुरु आहे.

Enforcement Department
महामार्गांवर ठेवा १०० पेक्षा कमी वेग! अतिवेगाने केला ४१ हजार व्यक्तींचा घात

जिल्ह्यातील माजीमंत्री सिध्दाराम म्हेत्रे, आमदार बबनराव शिंदे, संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दिलीप माने यांच्यासह भाजपचे आमदार सुभाष देशमुख, समाधान आवताडे, माजी आमदार प्रशांत परिचारक हे कारखान्यांशी संबंधित लोकप्रतिनिधी आहेत. देशभरात महागाई वाढत असतानाही त्यांच्याकडून केंद्रातील मोदी सरकारविरोधात ‘ब्र’देखील काढला जात नाही. कोणत्याही कारखान्याशी संबंधित नसलेल्या काँग्रेसच्या एकमेव आमदार प्रणिती शिंदे या ईडीसह केंद्रातील मोदी सरकारविरोधात बोलताना दिसतात. माढा तालुक्यातूनच गेलेल्या तक्रारीवर ईडीने आमदार बबनराव शिंदे व त्यांचे चिरंजीव रणजितसिंह शिंदे यांची चौकशी केली. मुंबईनंतर सोलापूर जिल्ह्यात ईडी पोहचल्याने काहींनी आणखी जास्तच धास्ती घेतल्याची चर्चा आहे. आता तर देवेंद्र फडणवीस हे सोलापूर जिल्ह्याचे प्रभारी असल्याने ते कोणाचा भ्रष्टाचार बाहेर काढतील, याचीही भीती अनेकांना आहे. दरम्यान, केंद्रीय यंत्रणांचा भाजपकडून गैरवापर होत असल्याबद्दलची तक्रार लोकसभेपर्यंत पोहचली. तरीही, काहीच बदल झालेला नाही. त्यामुळे केंद्रातील भाजपविरोधात बोलण्यापेक्षा आपल्या मतदारसंघातील विकासकामावर आमदारांनी लक्ष दिल्याचेही चित्र आहे. एका माजी मंत्र्याने तर ईडीबद्दल बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला. त्यावरून स्पष्ट होते की अनेकांना ईडीची सध्या भीती वाटू लागली आहे.

Enforcement Department
शाळांमध्ये शिक्षकांना आता मोबाईल बंदी! शाळा व्यवस्थापन समिती मोबाईल करणार जप्त

पुढचा नंबर कोणाचा...
कारखान्यांशी संबंधित प्रकरणावरून आमदार बबनराव शिंदे यांना मुलासह मुंबईतील ईडी कार्यालयात तीनवेळा हेलपाटे मारावे लागल्याची सर्वत्र चर्चा आहे. आतापर्यंत कोणालाही माहिती नसलेली ईडी आता चांगलीच ॲक्टिव्ह झाल्याचे चित्र आहे. माजी मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनीही केंद्रातील गृहमंत्रीपद सांभाळले, पण त्यांच्या काळात कोणाला ईडी माहितीदेखील नव्हती. पण, आता खरोखरच गावागावापर्यंत ईडीची ओळख झाली आहे. त्यामुळे प्रत्येक छोट्या-मोठ्या व्यवहारात लोक ईडीची भीती दाखवू लागल्याचीही स्थिती आहे. त्यामुळे आमदार बबनराव शिंदे यांच्यानंतर पुढचा नंबर कोणाचा, याचे तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com