Jayant Patil: जयंत पाटील यांची चौकशी कशासाठी? नेमकं काय आहे कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 Jayant Patil

Jayant Patil: जयंत पाटील यांची चौकशी कशासाठी? नेमकं काय आहे कारण

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील चौकशीसाठी ईडी कार्यालयात दाखल झाले असून सध्या त्यांची चौकशी सुरू आहे. इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेसशी (IL & FS) संबंधित कथित गैरव्यवहाराबाबत त्यांची ईडीकडून चौकशी (ED Inquiry) होत आहे. ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. 'याप्रकरणाशी माझा काहीही संबंध नाही. ईडीच्या चौकशीला मी घाबरत नाही.', असे त्यांनी यावेळी म्हंटलं आहे.

जयंत पाटील यांना चौकशीसाठी बोलवण्यात आलेलं इन्फ्रास्ट्रक्चर लीजिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस नेमकं काय प्रकरण आहे?

मिळालेल्या माहितीनुसार, IL&FS कंपनीला 2008 ते 2014 या कालावधीत रस्ते उभारणीचं कंत्राट मिळालं होतं. हे कंत्राट उपकंत्राटदार देण्यात आलं. उपकंत्राटदाराने कथितरीत्या जयंत पाटील यांच्याशी संबधित कंपन्यांना पैसे दिल्याचा आरोप आहे. जयंत पाटील त्या काळामध्ये राज्याचे गृहमंत्री होते.

IL&FS कंपनीवर 91 हजार कोटी रुपयांचं कर्ज आहे. अनेक प्रकल्प अपूर्ण अवस्थेत असल्यामुळे त्यांच्याकडे पैसा नाही. सरकारकडून मिळणारे 17 हजार कोटी अडकले. कंपनीचे एकूण 250पेक्षा अधिक सब्सिडिरीज आणि जाँईंट व्हेंचर्स आहेत. जमिनीच्या वादात जास्त नुकसान भरपाई दिल्यामुळे प्रकल्पांचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला. अनेक महत्त्वाचे म्युचअल फंडस् आणि पेन्शन योजना टांगणीवर लागल्या आहेत. याच प्रकरणात जयंत पाटील यांचेही नाव समोर आल्याचे ईडीने म्हटले आहे.

विरोधी पक्षात आहोत, काही गोष्टी सोसाव्या लागणारच

सर्वांनी शांत राहावं. मला जे काही विचारलं जाईल त्याची उत्तरं मी देईल. चिंतेचं काही कारण नाही. सर्वांनी शांतता राखा, आपण विरोधी पक्षात आहोत. काही गोष्टी सोसाव्या लागणारच ना. सर्व कसं सहसासहजी होईल? काही गोष्टी होतच असतात. त्यामुळे त्याला तोंड द्यायचं असतं, असं जयंत पाटील यांनी म्हंटलं आहे.