शिवसेनेने का बोलावली आमदारांची बैठक

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 9 फेब्रुवारी 2020

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेना आमदारांची उद्या (ता. ९) शिवसेना भवन येथे बैठक होणार आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्याबरोबरच मुख्यमंत्री आमदारांना संबोधित करतील.

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर शिवसेना आमदारांची उद्या (ता. ९) शिवसेना भवन येथे बैठक होणार आहे. या बैठकीला मार्गदर्शन करण्याबरोबरच मुख्यमंत्री आमदारांना संबोधित करतील.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्यात २०१४ मध्ये शिवसेना आणि भाजप युतीची राज्यात सत्ता होती. या सत्तेत शिवसेनेला न्याय्य वाटा मिळाला नसल्याच्या तक्रारी शिवसेना आमदार सातत्याने करत होते. तसेच, शिवसेनेचे मंत्रीदेखील आपल्याला अधिकार मिळत नसल्याच्या तक्रारी करत होते. या पाच वर्षांच्या सत्तेत शिवसेना नेते नाखूश होते. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शिवसेना आमदारांच्या नियमित बैठका आयोजित करत होते. यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे मंत्री शिवसेना आमदारांना सापत्न वागणूक देत असल्याचा आरोप करत होते. तसेच, मतदारसंघातील विकासकामांसाठी फडणवीस शिवसेना आमदारांना पुरेसा निधी देत नव्हते, अशी खंतदेखील आमदार उद्धव ठाकरे यांच्याकडे व्यक्‍त करत होते.

शिवजयंती तारखेनेच साजरी करण्याची मागणी

गेल्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात राजकीय समीकरणे बदलली आणि शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीची सत्ता आली, त्यामुळे शिवसेनेत आनंदाचे वातावरण आहे. महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जनतेची कामे आणि पक्ष वाढविण्यावर शिवसेनेचा भर असेल, असे शिवसेना नेते सांगत आहेत. त्यामुळे सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी प्रथमच शिवसेनेच्या आमदारांची पहिली बैठक आयोजित केली.  तसेच, आमदारांच्या मतदारसंघातील कामांचा आढावा, विकासकामांसाठी आवश्‍यक निधी, सरकार पातळीवर काही अडचणी असल्यास त्या जाणून घेणार आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Why Shiv Sena convenes MLAs meeting