...म्हणून सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष बनवलं, शरद पवारांनी सांगितलं कारण : Supriya Sule | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

mp Supriya Sule

Supriya Sule: ...म्हणून सुप्रिया सुळेंना कार्याध्यक्ष बनवलं, शरद पवारांनी सांगितलं कारण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पहिल्यांदाच कार्याध्यक्षपदं निर्माण करण्यात आली असून या पदांवर सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची नियुक्ती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. पण यामध्येही आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडं कार्याध्यक्षपद का सोपवलं याची माहिती पवारांनी पत्रकार परिषदेत दिली. (Why Supriya Sule was made the working president of NCP Sharad Pawar told reason)

पवार म्हणाले, देशातले जे तीन-चार महत्वाचे राज्ये आहेत. तिथं कोणी एक सहकारी जास्त मेहनत करेल तर पक्षाची पोहोच वाढू शकते. त्यामुळं या देशातील सर्व राज्यांची जबाबदारी कोणा एका सहकाऱ्यावर सोपवली तर आमच्या हातात निवडणुकीसाठी एक वर्षाहून कमी कालावधी आहे. त्यासाठी आम्ही सर्व ठिकाणी पोहोचू शकत नाही. त्यामुळं कामाची विभागणी करुन विविध सहकाऱ्यांवर जबाबदारी देण्याची गरज होती. (Marathi Tajya Batmya)

त्यामुळं गेल्या दोन महिन्यांपासून लोक आपसात जी चर्चा करत होते की, कार्यकारी अध्यक्षपद हे देशाचा पसारा पाहता एकच नव्हे तर दोन असावेत अशी चर्चा झाली. तसेच या दोघांकडं कमीत कमी चार ते सहा राज्यांची जबाबदारी देण्यात यावी. यामुळं पक्षाच्या कामात सुधारणा होईल, यामुळं ही दोन पदं तयार केली गेली. (Latest Marathi News)

दुसरं म्हणाले, यासाठी सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांचीच निवड का करण्यात आली तर या दोघांबाबत लोकांची मागणी होती की त्यांच्यावर जबाबदारी देण्यात यावी. त्यामुळं सर्व लोकांसोबत चर्चा करुन या दोघांची निवड करण्यात आली आहे.