Ajit Pawar : शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार का उपस्थित नव्हते? त्यांनीच सांगितलं मोठं कारण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ajit Pawar

Ajit Pawar : शरद पवारांच्या पत्रकार परिषदेला अजित पवार का उपस्थित नव्हते? त्यांनीच सांगितलं मोठं कारण

पुणेः राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी परवा निवृत्तीचा निर्णय मागे घेतला. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेला अजित पवार यांनी अनुपस्थिती होती. त्यामुळे राज्यात पुन्हा चर्चा सुरु झाल्या होत्या.

२ मे रोजी शरद पवार यांच्या 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या सुधारीत आवृत्तीचं प्रकाशन झालं. त्याच कार्यक्रमात शरद पवार यांनी निवृत्तीची घोषणा केली होती. मात्र उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला.

त्यानंतर राज्यभर आंदोलनं पेटली. कार्यकर्त्यांनी पवारांच्या सिल्व्हर ओक निवासस्थानी एकच गर्दी करुन त्यांचवर दबाव आणला. शेवटी चार दिवासंनी ५ मे रोजी शरद पवारांनी निवृत्तीचा निर्णय मागे घेतला.

महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांनी ज्या दिवशी निवृत्ती जाहीर केली त्या दिवशी अजित पवारांचा ओरा उपस्थितांपेक्षा वेगळा होता. ते शरद पवारांच्या निवृत्तीच्या बाजूने असल्याचं दिसून येत होते. पुढे पवारांनी निवृत्ती मागे घेतल्यानंतर अजित पवार पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते.

एकतर मागील काही दिवसांपासून अजित पवार भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. त्या चर्चा अजित पवारांनी फेटाळून लावल्या असल्या तरी त्यांच्याभोवती संशयाचं वारुळ उभं राहात आहे. परवा शरद पवारांनी पत्रकार परिषदेत निवृत्ती मागे घेतली. त्या पत्रकार परिषदेला अजित पवार यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे चर्चेला पेव फुटलं होतं.

आज अजित पवारांना याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, राजीनाम्याचा विषय संपला असल्याने आम्ही कामाला सुरुवात केली आहे. पत्रकार परिषद झाली त्या दिवशी मी माझ्या नियोजित कार्यक्रमामुळे हजर राहू शकलो नाही. महत्त्वाचं म्हणजे शरद पवार यांच्याच आदेशामुळे पत्रकार परिषदेला उपस्थित राहिलो नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं, त्यामुळे पुन्हा वेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

टॅग्स :Sharad PawarAjit Pawar