राज्यातील 350 एसटींमध्ये आता वायफायची सुविधा

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 डिसेंबर 2016

औरंगाबाद - एसटी महामंडळाच्या बसगाडीने प्रवास करणाऱ्या स्मार्ट प्रवाशांसाठी मोफत वायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे. पुणे, मुंबई, कोकणातील काही जिल्ह्यांत धावणाऱ्या 350 गाड्यांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे.

साध्या बसपासून ते वातानुकूलित बसगाड्यांमध्ये ही सुविधा देण्यात येत आहे. मराठवाड्यासह राज्यभर ही सुविधा सर्वच बसगाड्यांमध्ये होणार असून त्याचे काम सुरू आहे, अशी माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली.

औरंगाबाद प्रदेशाची त्रैमासिक बैठक मंगळवारी "वाल्मी' येथे झाली.

बैठकीनंतर देओल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, 'गेल्या दोन महिन्यांपासून बसगाड्यांमध्ये वायफायची सुविधा देण्याचे काम सुरू आहे. सुरवातीला प्रायोगिक तत्त्वावर ही सुविधा दिली. ती यशस्वी ठरल्यामुळे ही सुविधा आता सर्वत्र देण्याचे काम सुरू झाले. प्रत्येक महिन्याला जवळपास दीड ते दोन हजार बसगाड्यांमध्ये ही सुविधा बसविण्याचे कार्य करण्यात येत आहे.''

औरंगाबाद आणि मराठवाड्यातील प्रवाशांना लवकरच या सुविधेचा फायदा घेता येणार आहे. पुणे, मुंबई, रायगड, पनवेल, कोल्हापूर सर्व जिल्ह्यांत धावणाऱ्या 350 बसगाड्यांमध्ये ही सुविधा सुरू झाली आहे, असेही देओल यांनी सांगितले.

Web Title: wi-fi facility in st