खरंच प्रेम इतकं आंधळं असतं?

Husband-Murder-by-Wife.jpg
Husband-Murder-by-Wife.jpg

"प्रेम" एक साधा शब्द. फक्त दोन अक्षरी. त्याचा अर्थ सांगावा लागत नाही. सगळ्यांना कळतो. आणि लहान-मोठी, गरीब-श्रीमंत, अडाणी-शहाणी, सगळीच माणसं कोणावर तरी, केव्हातरी प्रेम करतात. अहो, अगदी कुरूप, अपंग, अर्धवट माणसालादेखील त्याच्या आईचं प्रेम लागतंच. काही काही वेळा तर एखादी आई त्या प्रेमापोटी आपलं सगळं आयुष्य अशा मुलाला सांभाळण्यात घालवते. शब्द साधा, सगळ्यांना समजणारा, असं म्हटलं खरं. पण तसं खरोखर आहे का हो ? ‘ अ ‘ चं ‘ ब ‘ वर प्रेम आहे म्हणजे काय आहे ते तुम्हाला सांगता येईल? विचार करा. प्रेमाच्या इतक्या वेगवेगळ्या तऱ्हा असतात. ते इतकी विचित्र रूपं धारण करतं की ते पाहताना मन अगदी अस्वस्थ होते. काल आपल्या राज्यात अशीच एक गोष्ट घडली आणि मन सुन्न झाले. ही घटना आधी आपण समजून घेऊ. 

हनीमूनला निघालेल्या पत्नीने प्रियकराच्या मदतीने सुपारी देऊन पतीची हत्या केल्याची घटना सातारा जिल्ह्यात घडली. या प्रकरणात सातारा पोलिसांनी नववधूसह तिच्या प्रियकराला अटक केली आहे. आनंद कांबळे आणि पत्नी दिक्षा कांबळे हे नवदाम्पत्य हनीमूनसाठी पुण्यातून महाबळेश्वरला निघाले. पसरनी घाटात थांबल्यानंतर मोटरसायकलवरुन आलेल्या दोन अज्ञातांनी पतीवर कोयत्याने वार केले, ज्यात आनंद कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना लुटमारीतून घडली असल्याचं भासवण्याचा प्रयत्न केला गेला. यात नवविवाहिता दिक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हल्लेखोरांनी लंपास केलं. पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्नही झाला. मात्र गुन्हे अन्वेषण  विभागाच्या पथकाने शिताफिने तपास करुन पत्नी दिक्षाला बोलतं केलं आणि ही खळबळजनक घटना उजेडात आली. दिक्षाचे पुणे येथील नितीन मळेकर या युवकासोबत प्रेमसंबध होते. लग्नाला घरातील लोकांकडून विरोध असल्यामुळे तिने घरातील लोकांच्या मर्जीने नातेसंबधातील आनंद कांबळे याच्यासोबत 26 मे रोजी विवाह केला. हे नवदाम्पत्य महाबळेश्वरला हनीमूनसाठी निघालं होतं.

महाबळेश्वरला जाताना दिक्षाने पसरनी घाटात उलटी होत असल्याचं नाटक करुन पतीला गाडी थांबवण्यास सांगितलं. त्याच वेळी मोटरसायकलवरुन आलेल्या दोन युवकांनी कोयत्याने आनंदवर सुमारे दहा ते बारा वार केले आणि जाताना दिक्षाच्या गळ्यातील मंगळसूत्रही हिसकावून नेलं. जखमी झालेल्या आनंदला साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपाचारासाठी नेण्यात आलं. मात्र त्यांचा जागीच मृत्यू झाल्याचं समोर आलं. 

प्रेम विवाहाला पालकांचा विरोध का? 

 प्रेेम शब्द ऐकला की पालक मंडळीच्या डोक्यात कळ येते म्हणजे येते. आजही प्रेम करण्यास शेण खाणे म्हणतात. तरी हल्ली सजातीय युगुलाना बरे दिवस आलेत पण जर तुमचे प्रेम आंतरजातीय असेल तर मग,काही खरं नाही. पळुन लग्न,आत्महत्या, ऑनर किलिंग ई. तुम्हाला जवळचे मित्र सोडले तर कोणीच वाली नाही. समाजाची जडण घडण ह्यास मान्यता देत नाही उलट अश्या जोडप्यांना , त्यांच्या घरच्यांना हिन दृष्टीने लेखतात, वेगवेगळे लेबल जोडतात ,त्या मुळे प्रेमास सकरात्मत असणारे पालक ही विरोध करतात.प्रेमास मान्य करून विवाहास मान्यता देणारे पालक मोजकेच. आपल्या पाल्याने आंतरजातीय प्रेम प्रकरण वा विवाह केल्या कारणांमुळे  त्यांचा निर्घुण हत्या करण्याचा प्रकार हल्ली नेहमीचा झालाय.यात खून करणारे थंडपणे खून करून होईल ती शिक्षा भोगण्यास तयार असतात पण मान्यता नाही म्हणजे नाही. खरं तर दीक्षाच्या पालकांनी तिच्याशी संवाद साधला असता, तिला समजून घेतले असते तर निष्पाप आनंदचा बळी गेला नसता. या प्रकरणात दीक्षा आणि तिच्या प्रियकराबरोबर तिचे पालकही आनंदच्या हत्येस तेवढेच जबाबदार आहे.  'पालकांनी आपल्या मुलांच्या प्रेमाला विरोध करण्याआधी काहीवेळ विचार करायला हवा. वेळीच प्रसंगावधान दाखवून निर्णय घेतल्यास भविष्यात चुकीचा निर्णय घेतल्याचे शल्य राहणार नाही. 

मुलांनीही पालकांशी संवाद साधावा 

बदलत्या जीवनशैलीनुसार लोकांचे विचार आणि मानसिकता बदलणेही खूप आवश्यक आहे. आई-वडील जरी चित्रपट, मालिकामधील प्रेमाच्या कथा स्वीकारत असले तरी जेव्हा आपल्या मुलांच्या लव्ह मॅरेजचा विषय येतो तेव्हा ते गोंधळतात. यामुळे काही प्रेम करणारे मुले-मुली इच्छा असूनही ते पालकांशी शेअर करू शकत नाहीत. यासाठी पालकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. सर्वप्रथम पार्टनर हा तुमचा एक चांगला मित्र असल्याचे ओळख पालकांना करुन द्या. यामुळे तुमच्या पार्टनरशी आणि पालकांशी चांगले नाते तयार होईल. जेव्हा ते तुमच्या पार्टनरला पसंत करू लागतील तेव्हा हळूहळू त्याच्याविषयी सांगण्यास सुरुवात करा. पालकांना त्याच्या चांगल्या गोष्टी शक्य असेल तेव्हा शेअर करा. खास करुन तुम्ही त्याचे कौतुक करू शकता. यामुळे तुम्ही त्याला पसंत करत असल्याचे संकेत मिळतील. 

कुटुंबातील ज्या व्यक्तीशी तुम्ही मनमोकळेपणाने बोलता त्यांना तुमची आवड सांगा. तसेच घरात त्यांच्या अधिक दरारा असतो त्यांना समजविण्याचा प्रयत्न करा. जेव्हा तुमच्या पालकांना तुमच्या लव्ह मॅरेजविषयी समजेल तेव्हा ते विरोध करण्याची शक्यता असते. यावेळी तुम्ही त्यांना यशस्वी झालेल्या विवाहाची उदा. सांगून समजवा. अशा प्रकरणाला थोडा वेळ देणे आवश्यक असते. कधी-कधी पालक तुमचे संकेत समजूनही दुर्लक्ष करतात. परंतु तुमची पसंती ते मान्य करू शकतात. 

लग्न आणि प्रेम दोन वेगळ्या गोष्टी 

 ज्या आपण व्यक्तीवर प्रेम करतो त्या व्यक्तीबरोबर तुमचं लग्न झालं तर तुम्ही खरंच नशीबवान आहेत असं समजा. परंतु तुमचे आवडते व्यक्ती बरोबर लग्न झाले नाही तर निराश होऊ नका. दीक्षा सारखे टोकाचे पाऊल उचलू नका. प्रेम केले म्हणजे त्याच व्यक्ती बरोबर लग्न झालेच पाहिजे हा आग्रह नको. कारण प्रत्येकाचे प्रेम पूर्ण होणे आपल्या समाज व्यवस्थेत शक्य नाही. जगात असे अनेक उदाहरणे आहेत कि ज्यांचे प्रेम एका व्यक्तीवर व लग्न दुसऱ्या व्यक्तीशी. ते  वैवाहिक जीवनात यशस्वीही झाले आहेत. या दोन्ही गोष्टीमधील फरक ओळखून ती प्रत्येक फेज एन्जॉय करा. 

काल झालेल्या गोष्टीची पुनरावृत्ती टाळायची असेल तर पालकांनी आपल्या मुलांशी योग्य संवाद ठेवायला हवा. हा संवाद राहिला तरच आपल्या विवाह व्यवस्थेवर सगळ्यांचा विश्वास राहील व यात निष्पाप लोकांचा बळी जाणार नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com