पत्नीसह तीन मुलांचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 फेब्रुवारी 2017

लोणी - लोणी खुर्द येथे विखे महाविद्यालयासमोर राहणाऱ्या एकाने मंगळवारी पहाटे पत्नी व तीन मुलांचा खून केला. त्यात दोन मुलींचा समावेश आहे. या घटनेनंतर आरोपी आज सकाळी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला. दरम्यान, आरोपी मनोरुग्ण असल्याचा संशय आहे. 

देवीचंद ऊर्फ बापू हिराचंद ब्राह्मणे (वय 40) असे आरोपीचे नाव आहे. त्याने पत्नी संगीता (वय 35), मुली निशा (वय 15) व स्नेहल ऊर्फ नेहा (वय 11) आणि मुलगा हर्षवर्धन (वय 7) यांचा निर्घृणपणे खून केल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी सांगितले, की येथील आठवडे बाजारासोबत भरणाऱ्या जनावरांच्या बाजारात पार्किंगचे काम करणारा देवीचंद पत्नी, दोन मुली व मुलासह भाड्याच्या घरात राहत होता. त्याने आज पहाटे घराशेजारी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ संगीताच्या डोक्‍यात कुऱ्हाडीचा घाव घालून खून केला. त्यानंतर त्याने निशा व स्नेहल यांचाही कुऱ्हाडीचे घाव घालून आणि हर्षवर्धनचा गळा दाबून खून केला. सकाळी घराला बाहेरून कुलूप लावून तो पोलिस ठाण्यात आला आणि खून केल्याचे सांगितले.

Web Title: wife, three children murder

टॅग्स