...तर महाराष्ट्रात एकही जागा मागणार नाही; ओवैसींची काँग्रेसला ऑफर(व्हिडिओ)

शुक्रवार, 18 जानेवारी 2019

आज एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी काँग्रेसला एक थेट ऑफरच दिली. जर काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसने व्यवस्थित सन्मान केला तर एमआयएम हा महाराष्ट्रातून एकही जागा मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

मुंबई- आज एमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवैसी काँग्रेसला एक थेट ऑफरच दिली. जर काँग्रेसने भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांचा काँग्रेसने व्यवस्थित सन्मान केला तर एमआयएम हा महाराष्ट्रातून एकही जागा मागणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 

काँग्रसे आघाडीत सामील होण्यासंबंधी ओवैसींचे हे थेट विधान असल्याचे मानले जात आहे. ओवैसींनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांचा नामोल्लेख करत आंबेडकरांना आघाडीत घेण्याचे आवाहन केले आहे. तुम्हाला माझ्यासोबत म्हणजेच एमआयएमसोबत प्रॉब्लेम असेल तर ठीक आहे, पण आंबेडकरांच्या सन्मानाप्रमाणे त्यांना व्यवस्थित जागा दिल्यास आपण महाराष्ट्रात एकही जागा मागणार नसल्याचे त्यांनी भर सभेत सांगितले.

ओवैसींची एमआयएम म्हणजे भाजपची बी टीम असल्याचा आरोप नेहमीच होत असतो पण आता ओवैसींनीच काँग्रसला ऑफर दिली आहे. ओवैसींच्या या बदललेल्या भुमिकेमुळे केवळ महाराष्ट्रातीलच नाही तर देशातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

Web Title: will not ask for any seat in Maharashtra Owaisis offer to Congress