OBC आरक्षण कमी करून इतरांना देणार नाही- फडणवीस

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नागपूर- ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाही. समाजाने एकमेकांविरोधात जाऊ नये. अॅट्रॉसिटीच्या प्रकरणाची माहिती घेऊ, समिती तयार करू, समाजाचे प्रश्न सांमजस्याने सोडवू, असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर दिले. 

नागपूर- ओबीसी समाजाचे आरक्षण कमी करून दुसऱ्या समाजाला दिले जाणार नाही. समाजाने एकमेकांविरोधात जाऊ नये. अॅट्रॉसिटीच्या प्रकरणाची माहिती घेऊ, समिती तयार करू, समाजाचे प्रश्न सांमजस्याने सोडवू, असे आश्वासन देत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर उत्तर दिले. 

धनगर आणि मुस्लिम आरक्षणावर प्रस्तावावरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी उत्तर दिले. 
ते म्हणाले, "कोपर्डीला हीन घटना घडली. 
या घटनेची प्रतिक्रिया म्हणजे राज्यात सकल मराठा मूक मोर्चे निघाले
. लाखोंच्या संख्येने लोक यात सहभागी झाले. मोर्चाच्या आयोजकांचे आभार. 
अतिशय जोरकसपणे मागणी सरकारपुढे मांडली,
पण तेही अतिशय शांततेने. या निमित्ताने एक नवीन पायंडा घातला गेला."

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या भाषणातील ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे :

 • शेतकऱ्यांच्या समस्या सरकारने निर्माण केल्या नाही, मात्र सोडविण्याची जबाबदारी आहे : मुख्यमंत्री
 • कायद्याचा दुरुपयोग करणारा बाबासाहेबांचा अनुयायी नाही. मराठा मोर्चात अॅट्रासिटीचा दुरुपयोग होतो अशीच मागणी, सर्वांना मिळून विचार करावा लागेल, या कायद्याचे 'डायलुशन' करता येणार नाही. 
 • धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रस्ताव पाठविण्यासाठी 'टिस'चे संशोधन सुरू. दोन टप्पे पूर्ण झाले. ते पूर्ण होताच प्रस्ताव पाठविणार.
 • धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत संशोधन करण्याची गरज. त्यासाठी टिस (TISS) या संशोधन संस्थेला काम दिले आहे.
 • आमची 'कमिटमेंट' आहे आणि आम्ही ते पळणार आहोत. संशोधन पूर्ण झाल्यावर प्रस्ताव पाठवणार.
 • मुस्लिम आरक्षणाबाबत लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर काँग्रेसला उपरती झाली.
 • सरकार मुस्लिम सरकार विरोधात असते तर राजश्री शाहू महाराज योजनेत मुस्लिम विद्यार्थ्यांना सहभागी केले नसते. आम्ही समाजाविरोधात नाही. व्होट बँक म्हणून मुस्लिमांचा उपयोग झाला, त्यांना मुख्य धारेत येणार नाही तोपर्यंत सरकार प्रयत्न करेल.
 • निधीची तरतूद केली. मदरशांना भरीव अनुदान दिले. पायाभूत सोयी दिल्या.
 • संविधानाप्रमाणेच करवाई करू. पण आमची भूमिका अल्पसंख्यांक समाजाला न्याय देण्याची आहे. 
 • सर्व मुस्लिम समाजाच्या सदस्यांची बैठक घेऊन कुठल्या योजना आणि मदत हवी आहे ती करू. यावर राजकारण कोणी करू नये- मुख्यमंत्री
 • मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर समाधान न झाल्याने विरोधकांनी केला सभात्याग
 • मुख्यमंत्रांच्या उत्तरातून समाधानी नाही - विरोधकांचा सभात्याग
   
Web Title: will not give reservation from obc quota