लोकसभेेबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेऊ : शरद पवार

लोकसभेेबाबतचा निर्णय दोन दिवसांत घेऊ : शरद पवार

पंढरपूर : माढा लोकसभा निवडणुकीतील उमेदवारीच्या मुद्यावरून चर्चेला उधाण आले आहे. असे असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगोल्यातील दुष्काळ परिषदेला आज (शनिवार) हजेरी लावली. यावेळी शरद पवार म्हणाले, माढा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबत चर्चा करून
उमेदवारीचा निर्णय दोन दिवसांत घेण्यात येईल.

शुक्रवारी शरद पवारांनी लोकसभेसाठी मी इच्छुक नाही. मात्र, ज्येष्ठ नेत्यांचा आग्रह आहे, अशी गुगली टाकली होती. त्यामुळे आता ते यावर काय बोलतील, याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.

या दुष्काळी परिषदेत शरद पवार यांनी सरकारवर चौफेर टीका केली. ''मला पराभूत करू म्हणणाऱ्यांनी आणि माझ्या तब्येतीची काळजी करणाऱ्यांनी स्वतःच्या पक्षाची चिंता करावी'', असा टोला पवारांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांना लगावला. भाजपकडून पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींचे नाव पुढे येत असेल तर ते त्यांच्यासाठी धोक्याचे आहे, असे समजावे.

सहा हजार रुपये देऊन सरकारकडून शेतकऱ्यांची चेष्टा

महाविद्यालय आणि शाळेत जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या मुली उपोषण करीत आहेत. ही बाब देशासाठी गंभीर आहे. फेब्रुवारी सुरू झाला तरी अजून चारा छावण्याचा पत्ता नाही. पीक विमा योजना रक्कम अजून मिळाली नाही. कर्जमाफी किती जणांची केली, याचे आकडे देत नाहीत. सहा हजार रुपये देऊन सरकारने शेतकऱ्यांची चेष्टा केली, असेही ते म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com