महिला अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई : मुख्यमंत्री

वृत्तसंस्था
मंगळवार, 10 डिसेंबर 2019

- पोलिस महासंचालक कार्यालयात राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक

मुंबई : पोलिस महासंचालक कार्यालयात राज्य पोलिस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची आढावा बैठक आज (मंगळवार) झाली. त्यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 'राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या प्रकरणात तातडीने कारवाई करा', असे आदेश दिले. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळच ऍप

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस राज्याचे पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल, मुंबईचे पोलिस आयुक्त संजय बर्वे यांच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी उपस्थित होते. महिलांवरील अत्याचाराबाबत कठोरात कठोर पावले उचलण्यात यावी. महिला अत्याचाराच्या प्रकरणात तत्काळ व जलद कारवाई करून गुन्हेगारांना वचक बसेल, असे काम करावे, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. 

शरद पवारांना दरवेळी माझ्या जातीची आठवण करून द्यावी लागते : फडणवीस

निर्भया फंडाच्या विनियोगासाठी कार्यपद्धती तयार करा

मागील शासनाच्या कालावधीत निर्भया फंडमधील निधी खर्च न झाल्याची बाब गंभीर आहे. या निधीचा तत्काळ विनियोग करता येईल, याची कार्यपद्धती तयार करा, असे आदेशही यावेळी दिले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: will take Immediate action against women torture cases: says Uddhav Thackeray