विल्यम मेकपिस ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे काय आहे संबंध?

Balasaheb Thackeray
Balasaheb Thackeray

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे उत्तम वक्ते होते. व्यंगचित्रकार होते. अभ्यासू होते. त्यांचं वाचनही अफाट होतं. मराठी भाषेवर, मराठी माणसावर त्यांचं प्रचंड प्रेम होतं. त्याबाळासाहेब ठाकरे याचं आडनाव इंग्रजी आहे, असं सांगितलं तर तुमचा विश्वास बसणार नाही. पण, हे खरं आहे. ठाकरे यांच्या आडनावाचे स्पेलिंग Thakre वरून Thackeray असं करण्यात आलंय. मुळात हे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील प्रबोधनकार ठाकरे यांनीच केलं होतं. 

कोण होता विल्यम ठाकरे?
ठाकरे कुटुंबाचं हे इंग्लिश कनेक्शन खूपच इंटरेस्टिंग आहे. भारतात विल्यम मेकपिस ठाकरे नावाचा एक ख्यातनाम साहित्यक होऊन गेला. त्याचा जन्म कोलकात्यात झाला होता. त्याचे वडील ब्रिटिश ईस् इंडिया कंपनीत नोकरीला होते. ईस इंडिया कंपनीसोबत संपूर्ण कुटुंब भारतात स्थलांतरीत झालं होतं. त्यावेळी विल्यमचा जन्म झाला होता. पुढं विल्यम कवी आणि कादंबरीकार बनला. तो इंग्लंडला परत गेला आणि इथंच त्याचा मृत्यू झाला. 

ठाकरे आडनावाचा प्रवास
ठाकरे कुटुंबानं हे आडनाव स्वीकारण्यापूर्वी त्यांची दोन आडवानं होती. प्रबोधनकार ठाकरे यांच्या माझी जीवनगाथा या आत्मचरित्रात याचा उल्लेख आहे. ठाकरे कुटुंबांचे पूर्वीज नाशिकजवळच्या धोडप किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यावेळी त्यांचे आडनाव धोडपकर, असे होते. ठाकरे कुटुंब पनवेल येथे स्थलांतरीत झाल्यानंतर त्यांचे आडनाव पनवेलकर झाले. बाळासाहेब ठाकरे यांचे वडील केशव सीताराम ठाकरे यांनी ठाकरे आडनाव लावण्यास सुरुवात केली. त्याचवेळी ठाकरे आडनावाचे स्पेलिंग Thakre वरून Thackeray असे करण्याचाही निर्णय प्रबोधनकारांनी घेतला. आवडत्या लेखकाच्या आदरासाठी त्यांनी ठाकरे आडनावाला विल्यम मेकपिस ठाकरे यांच्या आडनावाचे स्पेलिंग स्वीकारले. त्यांनी प्रबोधन नावाचे एक मासिक सुरू केले आणि त्यानंतर त्यांचे नाव प्रबोधनकार ठाकरे असे झाले. पुढे बाळासाहेब ठाकरे यांनी देखील विविध साप्ताहिक, दैनिकांमध्ये व्यंगचित्रं काढायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनीही Bal Thackeray असेच आपले स्पेलिंग केले. पुढे बाळ ठाकरेचे बाळासाहेब ठाकरे झाले आणि त्यांची आपल्या संघटन कौशल्याने, वक्तृत्व शैलीने संपूर्ण महाराष्ट्र गाजवला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com