सरकारने घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली अन्‌...

Wine home delivery of Four lakh 38 thousand people in Maharashtra
Wine home delivery of Four lakh 38 thousand people in Maharashtra

सोलापूर : देशात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्याला रोखण्यासाठी सरकार वेगवेगळ्या उपाययोजना करत आहे. त्यातूनच सुरु केलेल्या लॉकडाऊनचा चौथा टप्पा सुरु आहे. यामुळे अपवाद वगळता उद्योगधंदे बंद आहेत. (आता अनेक उद्योगांना परवानगी दिली आहे.) लॉकडाऊनचा फटका आर्थव्यवस्थेला बसला आहे. हा तोटा भरुन काढण्यासाठी इतर प्रयत्नासह सरकारने मद्य विक्रीस परवानगी दिली. यावर टीकाही झाली. दारूची दुकाने सुरु झाली तेव्हा मोठी गर्दी पाहायला मिळाली. त्यातून सोशल डिस्टन्सिंगचाही फज्जा उडाला. त्यामुळे पुन्हा सरकारने घरपोच दारु देण्यास विक्रेत्यांना परवानगी दिली. त्याला काही अटीही घालण्यात आल्या आहेत.
देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसांदिवस वाढत आहे. त्यामुळे एकीकडे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण आहे. तर दुसरीकडे मात्र तळीरांमध्ये कसलीच भिती नसल्याचे चित्र दिसत आहे. लॉकडाऊन काळात सरकारने अत्यावश्‍यक सेवा सोडून सर्व व्यवसाय, उद्योग बंद केले होते. तरी ग्रामीण भागात काही ठिकाणी चोरीच्या मार्गाने गावठी मद्य तयार करण्याचे काम सुरु होते. पोलिसांनी अशा अड्ड्यांवर कारवाई केल्याच्या नोंदीही आहेत. काही दिवसांपासून सरकारने मद्य विक्रीला परवानगी दिली. आणि दारुच्या दुकानांसमोर तळीरामांची गर्दी होऊ लागली. त्यानंतर महाराष्ट्र सरकारनं घरपोच दारू विक्रीला परवानगी दिली.

सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
एवढ्या जणांना केली घरपोच दारु

महाराष्ट्र सरकारने घरपोच मद्यविक्रीला परवानगी दिली. यातून १५ ते २८ मे दरम्यान चार लाख ३८ हजार ७५१ ग्राहकांना घरपोच मद्य देण्यात आले आहे. याची माहिती देणार ‘टि्वट’ माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने केले आहे. दिवसभरात ५५ हजार ३६८ ग्राहकांना घरपोच मद्य दिले जात आहे. यापैकी मुंबई शहर आणि मुंबई उपनगरात ३० हजार ७०७ ग्राहकांना घरपोच मद्य विक्री केल्याचे यामध्ये सांगण्यात आले आहे. 

एवढ्या जणांवर झाली कारवाई
राज्यात ७१७६ मद्यविक्री दुकाने सुरू आहेत. १ मे पासून ९२ हजार ६१२ ग्राहकांना मद्यसेवन परवाने मंजूर करण्यात आले आहे. अवैध मद्य विक्री व वाहतूक रोखण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केलेल्या धडक कारवाईत आतापर्यंत ६४२४ गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर दोन हजार ९९४ संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर १७ कोटी ३३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

घरपोच मद्य विक्रीसाठी ही आहे अट
घरपोच मद्य विक्रीसाठी सरकारने परवानगी दिली आहे. त्यात काही अटीही घालण्यात आल्या आहेत. मुंबई विदेशी मद्य नियम, 1953 अंतर्गत दारू विक्रेत्यांकडे परवाना आहे, तेच सरकारनं घालून दिलेल्या अटींच्या अधीन राहून दारू घरपोच देऊ शकतात, असे आदेशात म्हटल आहे.

कोणती दारू मिळते घरपोच?
भारतीय बनावटीचे विदेशी मद्य-स्पिरिट्स, बीअर, सौम्य मद्य, वाईन

घरपोच मद्यसाठी अशा आहेत अटी

  • दारू पिण्याचा परवाना असलेल्या परवानाधारक व्यक्तीलाच संबंधित विक्रेता घरपोच दारु देऊ शकतो.
  • जिल्हाधिकारी किंवा काही विशिष्ट ठिकाणी संबंधित महापालिका आयुक्तांनी दुकानं उघडी ठेवण्यास परवानगी दिली आहे, अशाच ठिकाणी घरपोच मद्यसेवा दिली जाते. प्रतिबंधीत क्षेत्रामध्ये ही सेवा दिली जात नाही.
  • विहीत केलेल्या दिवशी आणि वेळेत विदेशी मद्याची विक्री दुकानदार त्याच्या दुकानातून करेल.
  • परवानाधारकाने मद्याच्या विक्रीसाठी मागणी नोंदवली, तरच परवानाधारकास मद्याचे वितरण निवासी पत्यावर करता येईल.
  • घरपोच मद्य देणाऱ्या व्यक्तींची वैद्यकीय तपासणी करून ते वैद्यकीयदृष्ट्या पूर्ण पात्र ठरले, तरच त्यांना ओळखपत्र देण्यात येईल.
  • मद्य घरपोच देणाऱ्या व्यक्तींनी मास्क वापरावा. वेळोवेळी हाताचं निर्जंतुकिकरण करावं. हे नियम पाळले जातील, याची दक्षता दारू विक्रेत्यानं घ्यायची आहे. याशिवाय इतरही काही अटी आहेत. 

काय होते सरकार टीका
सरकारने लॉकडाऊन काळात दारु विक्रीला परवानगी दिल्याने वेगवेगळ्या प्रकारची टीका केली जात आहे. दारु सोडून इतर विषयांकडेही लक्ष देण्याची मागणी केली जात असून शेतकरी आणि कामगार यांच्याकडेही लक्ष देण्याचा सल्ला दिली जात असून दारु विकणे हा सरकारचा मुख्य धंदा आहे का असा प्रश्‍न केला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com