'हे' तरुण उमेदवार गाजवणार महाराष्ट्राची विधानसभा | Election Results 2019

टीम ईसकाळ
Thursday, 24 October 2019

विधानसभेला उभे राहिलेल्या तरूणाईचा प्रचार तर धडाक्यात सुरूच होता, पण तो अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला. सोशल मीडिया, रोड शो, सभा, लोकांमध्ये स्वतः सहभागी होऊन त्यांनी मतदारांची मनं जिंकली आणि आज यामुळेच विजयाची मोहोर त्यांच्यावर नावावर उमटली आहे.

गेल्या महिनाभरापासून सुरू असलेली विधानसभेची रणधुमाळी आज विजयोत्सवाने संपन्न होईल. भाजपच्या जागा कमी झाल्या, आघाडीच्या जागा लक्षणीय वाढल्या. या सगळ्यात लक्ष वेधले ते तरूण विजयी आमदारांनी! वेगवेगळ्या पक्षाकडून निवडणूक लढवणारी ही तरूणाई सगळ्यांच्याच चर्चेचा विषय ठरली... यात काही नावं राजकीय घराण्यातीलच होती, तर काह नावं नव्याने पुढ येत होती. आता हीच तरूणाई आपल्या सरकारमध्ये जाऊन विधानसभा गाजवतील. यात मुलींची पण काही कमी नाही बरं का... 

देवेंद्रजी, हा इथे आहे महाराष्ट्रातला विरोधी पक्ष !

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही कमी वयातच आमदार झाले होते. या विधानसभेला उभे राहिलेल्या तरूणाईचा प्रचार तर धडाक्यात सुरूच होता, पण तो अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आला. सोशल मीडिया, रोड शो, सभा, लोकांमध्ये स्वतः सहभागी होऊन त्यांनी मतदारांची मनं जिंकली आणि आज यामुळेच विजयाची मोहोर त्यांच्यावर नावावर उमटली आहे.

ऋतुराज पाटील : 
29 वर्षीय ऋतुराजने उमेदवारी मिळाल्यापासूनच प्रचाराचा धडाका लावला होता. शिक्षण सम्राट डी. वाय. पाटील यांचा नातू व आमदार सतेज पाटलांचा पुतण्या असलेल्या ऋतुराज घरातूनच राजकारणाचे धडे मिळत होते. आपलं काम लोकांच्या उपयोगासाठी व्हावं या उद्देशाने त्याने कोल्हापूर दक्षिणमधून काँग्रेसकडून निवडणूक लढवली आणि जिंकले. 

धीरज देशमुख, अमित देशमुख : 
दिवंगत माजी मुख्यमंत्री व राज्याचे लोकप्रिय नेते विलासराव देशमुखांचा वारसा चालवणारे धीरज देशमुख व अमित देशमुख हे त्यांच्या सभांमुळे या निवडणुकीत गाजले. त्यांची भाषणं ऐकल्यावर अनेकांना विलासरावांचा भास झाला. अमित आणि धीरज लातूर शहर व लातूर ग्रामीण मतदारसंघातून काँग्रेसकडून रिंगणात होते. दोघेही यशस्वी मताधिक्याने विजयी झाले आहेत. 

Image result for dhiraj deshmukh amit deshmukh

रोहित पवार :
या निवडणूकीत सर्वाधिक चर्चेत असलेलं एकच तरूण नाव म्हणजे रोहित पवार... शरद पवारांचा नातू आणि एक यशस्वी उद्योजक म्हणून तर तो नावाजलेला होताच, पण पुणे जिल्हा परिषदेचा सदस्य म्हणून त्याने राजकीय क्षेत्रातही काम केले. उत्तम संघटन, वक्तृत्व आणि माणुसकी यामुळे तो आणखी लोकप्रिय होत गेला आणि कर्जत जामखेड मतदारसंघातून भाजपच्या राम शिंदेविरूद्ध यशस्वीपणे विजयी झाला.

आदित्य ठाकरे : 
हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंचा नातू आणि ठाकरे घराण्यातील निवडणूकीला उभा राहिलेला पहिलाच उमेदवार म्हणजे आदित्य ठाकरे. आदित्य मुंबईतील वरळी मतदारसंघातून विजयी झाला. शिवसेनेच्या युवासेनेचं नेतृत्व तो करतो. मुंबईतील अनेक उपक्रम आणि सामाजिक कामांत तो सहभागी असतो.  

सिद्धार्थ शिरोळे :
भाजपचे माजी आमदार अनिल शिरोळे यांचे पुत्र व पुण्यातील डेक्कन जिमखाना वॉर्डचे नगरसेवक सिद्धार्थ शिरोळे हे या विधानसभा निवडणूकीत भाजपकडून निवडून आले. नगरसेवक म्हणून कामाचा अनुभव, लोकांमध्ये राहून काम करण्याची सवय यामुळे त्यांनी मतदाराची मनं जिंकून घेतली.  

Image result for siddhartha shirole

नमिता मुंदडा :
राष्ट्रवादीच्या माजी मंत्री विमलताई मुंदडा याची सून व तरूण आमदार नमिता मुंदडा यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणूक लढवली व त्या मोठ्या मताधिक्याने जिंकूनही आल्या. तरूण महिला आमदारांपैकी त्या एक असतील.

प्रणिती शिंदे :
माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे दुसऱ्यांदा आमदारकीच्या रिंगणात उतरल्या आणि निवडून आल्या. तरूणाईचे व विशेष करून महिलांचे प्रश्न मांडण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या प्रणितीचा जनमानसात प्रभाव आहे.  

आदिती तटकरे :
श्रीवर्धन मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी विजय मिळवला. लोकसभा निवडणुकीत आदिती तटकरे यांचे वडील सुनील तटकरेंनी विजय मिळवला होता. त्यामुळे आता वडील लोकसभेत आणि मुलगी विधानसभेत असे चित्र पाहायला मिळणार आहे.

राम सातपुते : 
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा सक्रिय कार्यकर्ता राम सातपुतेने यंदा भाजपकडून निवडणूक लढवली. सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस विधानसभा मतदारसंघातून रामने निवडणूक लढवली. 

Image result for ram satpute


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winner Youth MLA in Maharashtra Assembly