विधानभवनात प्रचंड गदारोळ; सत्ताधारी, विरोधक आमने-सामने 

winter session
winter session

मुंबई : विधानसभा व विधानपरिषदेत आजही मराठा आरक्षणाच्या अहवालावरून प्रचंड गदारोळ झाला.

विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांच्या विरोधात सत्ताधारी भाजप आमदारांनी विधानभवनच्या पायऱ्यांवर बसून जोरदार घोषणाबाजी केली. धनजंय मुंडे हाय हाय, मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या मुंडेचा धिक्कार असो अशा घोषणा भाजप आमदारांनी दिल्या.

विधानपरिषदेत  मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडावा यासाठी मुंडे यांनी विधानपरिषदेत सरकारला धारेवर धरले. सरकार जातीयवाद करत असल्याच्या घोषणा देत विरोधी आमदारांनी कामकाजवर बहिष्कार टाकून घोषणाबाजी देत सभात्याग केला. विधानभवनच्या पायऱ्यांवर राष्ट्रवादीचे आमदार व सत्ताधारी आमदार यांच्या परस्पर घोषणांनी आरक्षणाचा विषय प्रचंड तापल्याचे सिध्द झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com