विधिमंडळाचे विशेष अधिवेशन संस्थगित; 16 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन

टीम ई-सकाळ
रविवार, 1 डिसेंबर 2019

- मुंबईतील विधिमंडळाचे विशेष अधिवेशन करण्यात आले संस्थगित.

मुंबई : मुंबईतील विधिमंडळाचे विशेष अधिवेशन आज संस्थगित करण्यात आले. पुढील हिवाळी अधिवेशन 16 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे, अशी घोषणा विधानसभेत अध्यक्ष नाना पटोले आणि विधानपरिषदेत सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

राज्यात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात सरकार स्थापन झाले आहे. या ठाकरे सरकारची बहुमत चाचणी काल पार पडली. त्यामध्ये महाविकासआघाडी सरकारला यश आले. त्यानंतर आज विधिमंडळाचे विशेष अधिवेशन घेण्यात आले होते. मात्र, हे अधिवेशन संस्थगित करण्यात आले. आता या सरकारचे विधिमंडळाचे हिवाळी अधिवशेन येत्या 16 डिसेंबरपासून नागपूर येथे होणार आहे. 

दरम्यान, विधानपरिषद व विधानसभेचे आजचे कामकाज राष्ट्रगीताने संपले आणि सभागृह संस्थगित करण्यात आले.

सौजन्य : डीजीआयपीआर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Winter Session of Maharashtra Legislature will start from 16 December