Winter Session: सत्तांतरानंतर ठाकरे-CM शिंदे पहिल्यांदाच येणार आमने-सामने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Eknath Shinde

Winter Session: सत्तांतरानंतर ठाकरे-CM शिंदे पहिल्यांदाच येणार आमने-सामने

Eknath Shinde: राज्य विधी मंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून नागपूरात पार पडणार आहे. मात्र या आगोदरच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वाद चालू झाला आहे. आज राज्य सरकारने विरोधकांना चहापानाच्या कार्यक्रमाचं निमंत्रण दिलं होतं. मात्र महाविकास आघाडीने हे निमंत्रण नाकारत चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. अशी माहिती विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेवून दिली.

हे होत असतानाच उद्या पार पडणाऱ्या अधिवेशनाला पक्ष प्रमुख उध्दव ठाकरे हजेरी लावणार, अशी माहिती मिळत आहे आणि उद्धव ठाकरे, १९ डिसेंबर रोजी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी नागपुरात दाखल होणार आहेत. आणि वादाचा विषय असलेल्या शिवसेना पक्ष कार्यालयात थेट जाणार आहे.

हेही वाचा: Mumbai: मुंबई पोलिसांची मोठी कारवाई, तीन ड्रग्ज तस्करांना अटक, 135 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त

हेही वाचा: "या मोर्चाची चेष्टा करणारेही तुम्हीच…"; 'त्या' व्हिडिओवरून संभाजीराजेंनी राऊतांना सुनावलं

दुपारी ते नागपुरात दाखल होतील .पक्षाच्या आमदार आणि कार्यकर्त्यांशी ते संवाद साधतील. सत्ताबदलानंतर आजी माजी मुख्यमंत्री समोरासमोर येण्याची वेळ येणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. हिवाळी अधिवेशनाला उध्दव ठाकरे हजर राहणार असल्याची माहिती आज शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिली.

त्यांनी दिवस अन तारीख सांगितली नसली तरी सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ते पहिल्याच दिवशी तेथे हजेरी लावणार आहेत अशी माहिती मिळत आहेत. दुपारी ते विशेष विमानाने नागपुरला जातील. माजी मंत्री आदित्य ठाकरे त्यांच्या समवेत जाणार की आधीच पोहोचले आहेत याबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही.