
असे होणार कामकाज
राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चा, पुरवण्या मागण्या, औचित्याची मांडणी, २९३ अंतर्गत प्रस्ताव, सत्ताधारी, विरोधक अंतिम आठवडा प्रस्ताव आदींच्या माध्यमातून कामकाज केले जाणार आहे.
अवधी कमी राहिल्याने सरकारकडून बगल; सरकार स्थापनेस विलंब झाल्याचा फटका
मुंबई - राज्यात सरकार स्थापन करण्यासाठी महिनाभर सुरू असलेल्या घोळाचा फटका नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील कामकाजाला बसला आहे. जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांची सोडवणूक होण्यासाठी प्रत्येक आमदारांकडून हक्काने वापरले जाणारे तारांकित प्रश्नांच्या आयुधाविना नागपूर येथील हिवाळी अधिवेशन पार पाडले जाणार आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप
सत्ता स्थापनेचा तिढा सुटत नसल्यामुळे मतमोजणी झाल्यानंतर महिना उलटला तरीही सरकार स्थापन झाले नाही. यानंतर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सूत्रे स्वीकारली. त्यानंतर हिवाळी अधिवेशनाच्या हालचाली सुरू झाल्या. मात्र अत्यंत कमी कालावधी शिल्लक राहिल्यामुळे हे अधिवेशन १६ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर असे पाच दिवस घेण्याचे निश्चित झाले आहे. तारांकित प्रश्न, अशासकीय प्रस्ताव सदस्याकडून किमान ३० ते ४० दिवस अगोदर ऑनलाइन दाखल करावे लागतात.
पीएम मोदींना माझ्या वडिलांनी विनम्रपणे नकार दिला
विधान परिषदेतील सदस्य हे किमान ४० दिवस अगोदर तर विधानसभेतील सदस्य किमान ३० दिवस अगोदर तारांकित प्रश्न, अशासकीय ठराव ऑनलाइन पद्धतीने दाखल करू शकतात. मात्र फार कमी दिवसांचा कालावधी शिल्लक उरल्याने तारांकित प्रश्न, अशासकीय ठराव या आयुधांना बगल देण्यात आली आहे. तारांकित प्रश्न, अशासकीय ठराव न घेता कामकाज होणार आहे. उरलेले कामही घाईघाईने उरकले जाणार आहे. केवळ पाच दिवसांच्या कालावधीत महाविकास आघाडीचे पहिले हिवाळी अधिवेशन पार पाडले जाणार आहे.