देशात महिलांवरील अत्याचारात महाराष्ट्र आघाडीवर

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 1 सप्टेंबर 2016

पुणे/नवी दिल्ली- यूपी आणि बिहार म्हणजे देशातील गुन्हेगारीची प्रमुख राज्ये असल्याची चर्चा आपण चवीने करतो. मात्र, केंद्रीय गुन्हे नोंदणी मंडळाने नुकतीच प्रसिद्ध केलेली आकडेवारी धक्कादायक व महाराष्ट्रासाठी डोळे उघडणारी आहे.

देशातील महिलांवर 2015 मध्ये झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या एकूण घटनांपैकी सर्वाधिक म्हणजे 13 टक्के गुन्हे महाराष्ट्रात झाले आहेत. महाराष्ट्रा पाठोपाठ मध्यप्रदेशात 9.9, तर उत्तर प्रदेशात 8.7 टक्के एवढे महिलांवरील लैंगिक अत्याचारांचे प्रमाण आहे. महाराष्ट्रात महिलांचा विनयभंग करण्यात आल्याच्या 11 हजार 713 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तसेच, भारतीय दंडविधानाच्या कलमांनुसार महिलांवरील लैंगिक अत्याचाराचे 16 हजार 989 गुन्हे झाले.

महाराष्ट्रात 2014 मध्ये बलात्काराचे 3438 गुन्हे दाखल झाले होते. तसेच, 2013 मध्ये महिलांविरोधात महाराष्ट्रात एकूण 24 हजार 895 गुन्ह्यांची नोंद झाली होती.

महत्वाच्या शहरातील दखलपात्र गुन्हे

दिल्ली- 1,73,947

अहमदाबाद- 15964

पुणे- 15349

मुंबई- 42940

नागपूर- 11018

औरंगाबाद- 7051

चेन्नई- 13422

बंगळूर- 35576

भोपाळ- 14857

Web Title: Women in Maharashtra ahead abuse