उद्योग उभारणीसाठी बचत गटांनी पुढाकार घ्यावा - सुभाष देसाई 

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 28 जून 2018

मुंबई - राज्यात बचत गटाचे मोठे जाळे आहे. या बचत गटातील महिलांनी उद्योग उभारण्यासाठी पुढाकार घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे, असे आवाहन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केले. उद्योग विभाग आणि वर्ल्ड ट्रेड सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय महिला उद्योजक चर्चासत्रात ते बोलत होते. या चर्चासत्राला उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, उद्योग विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सतीश गवई, उद्योग विकास आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे, उद्योजिका कल्पना सरोज, पूनम सोनी, वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या संचालिका रूपा नाईक, उद्योजक विजय कलंत्री आदी उपस्थित होते. 

महिलांना उद्योगासाठीची जमीन, अनुदान, कर्जसवलत देण्याची सरकारची तयारी आहे. महिला औद्योगिक धोरण कागदावर राहू नये, तर त्याची प्रत्यक्ष अमलंबजावणीसाठी सरकार प्रयत्नशील आहे. पुरुषांच्या मालकीचा एखादा उद्योग बंद पडला असेल तर महिलांनी एकत्र येऊन तो चालवण्याची तयारी दर्शवल्यास त्यांनाही मदत केली जाईल, असे त्यांनी सांगितले. 

आतापर्यंत सुमारे 28 हजार महिला उद्योजिकांना प्रशिक्षण दिल्याचे उद्योग राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील यांनी सांगितले. सुमारे 600 महिलांनी या चर्चासत्रात सहभाग नोंदविला. अभियांत्रिकी उद्योग- महिला उद्योजिकांसाठी संधी, ग्रामीण उद्योग, वित्तीय सहाय्य, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ व उद्योगांचे व्यवस्थापन यांसारख्या विविध विषयांवर चर्चासत्र पार पडले. 

उद्योजिकांचा गौरव 
महिला बचत गट एकत्र येऊन मोठा उद्योग उभारू शकतात. त्यासाठी त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. महिला उद्योजिकांची संख्या वाढवण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्रामार्फत चर्चासत्राचे आयोजन केले जाईल, असे देसाई यांनी सांगितले. या वेळी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल अंकिता श्रॉफ, अरुंधती जोशी, मुमताज पठाण, पूजा अहिरे या उद्योजिकांचा गौरव करण्यात आला. 

Web Title: women Self Help Group take the initiative to establish the industry