कृषी कौशल्य विकासासाठी सहकार्य करार

राहुरी विद्यापीठ, जि. नगर - वैयक्तिक कौशल्य विकास कार्यक्रम व कृषी संलग्न शैक्षणिक संस्थांच्या विशेष कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलताना डॉ. अशोक फरांदे. शेजारी डॉ. शरद गडाख, डॉ. श्रीमंत रणपिसे,  डॉ. अशोक मुसमाडे , डॉ. साताप्पा खरबडे, अंकित माहेश्‍वरी,
राहुरी विद्यापीठ, जि. नगर - वैयक्तिक कौशल्य विकास कार्यक्रम व कृषी संलग्न शैक्षणिक संस्थांच्या विशेष कार्यशाळेच्या उद्‌घाटन प्रसंगी बोलताना डॉ. अशोक फरांदे. शेजारी डॉ. शरद गडाख, डॉ. श्रीमंत रणपिसे, डॉ. अशोक मुसमाडे , डॉ. साताप्पा खरबडे, अंकित माहेश्‍वरी,

पुणे - आंतरराष्ट्रीय युवा कौशल्य दिनाचे औचित्य साधत सोमवारी (ता. १५) राज्यातील तीन कृषी विद्यापीठांमध्ये आयोजित कृषी शैक्षणिक संस्थांच्या बैठकीत वैयक्तिक कृषी कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम राबवण्यास सिमॅसिस लर्निंग एलएलपीस सहकार्य करण्याचा विश्वास व्यक्त केला. केंद्र शासनाची पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि राज्य शासनाच्या छत्रपती राजाराम महाराज कौशल्य विकास व उद्योजकता अभियानअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या या कार्यक्रमासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठ, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठांसमवेत सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. तसेच काही खासगी कृषी शैक्षणिक संस्थांसमवेतही सहकार्य करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

परभणी - ‘‘कृषी कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून बेरोजगार युवकांना रोजगारासाठी दिशा मिळेल. कौशल्यावर आधारित उत्पादनक्षम व्यवस्था निर्माण होऊन सामाजिक समृद्धी येईल,’’ असे प्रतिपादन वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण यांनी केले. 

या वेळी शिक्षण संचालक तथा अधिष्ठाता डॉ. प्रदीप इंगोले, संशोधन संचालक डॉ. दत्तप्रसाद वासकर, दैनिक ‘सकाळ’च्या नांदेड आवृत्तीचे सहयोगी संपादक दयानंद माने, सिमेसिस लर्निंगचे (एलएलपी) सहायक सरव्यवस्थापक अमोल बिरारी आदी उपस्थित होते. या वेळी डॉ. प्रदीप इंगोले यांनी मार्गदर्शन केले. 

राहुरी (जि. नगर) - देशातील ६७ टक्के लोकसंख्या तरुण आहे. केंद्र सरकारच्या कौशल्य विकास योजनेतून तरुणांना रोजगाराची चांगली संधी मिळणार आहे. सकारात्मक युवा पिढी घडविण्यासाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी हा उपक्रम कौतुकास्पद व स्तुत्य आहे, असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे यांनी केले. महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सभागृहात आयोजित विशेष कार्यशाळेच्या उद्‌घाटनप्रसंगी डॉ. फरांदे बोलत होते. 

विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख, सहयोगी अधिष्ठाता डॉ. श्रीमंत रणपिसे (निम्नस्तर कृषी शिक्षण), डॉ. अशोक मुसमाडे (धुळे), डॉ. साताप्पा खरबडे (नंदुरबार), ‘सिमॅसेस''चे बिजनेस हेड अंकित माहेश्‍वरी, विभागीय समन्वयक दिलीप क्षीरसागर, हेमंत जगताप, डॉ. मंजूषा मोरे उपस्थित होते. या वेळी डॉ. शरद गडाख, डॉ. अशोक मुसमाडे, डॉ. श्रीमंत रणपिसे यांनी मार्गदर्शन केले. ‘सिमॅसेस''चे अंकित माहेश्‍वरी यांनी प्रास्ताविक केले. हेमंत जगताप यांनी सूत्रसंचालन केले. दिलीप क्षीरसागर यांनी आभार मानले. 

दापोली - कौशल्य विकास आणि उद्योजकता अभियानांतर्गत कृषी क्षेत्रात व्यावसायिक करिअर करण्याची इच्छा असलेल्या बेरोजगार किंवा इच्छुक युवक-युवतींना मोफत व रोजगारक्षम वैयक्तिक कौशल्य विकास प्रशिक्षण उपक्रम कोकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या सर्व कृषी महाविद्यालयांमध्ये राबविण्याची ग्वाही डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. एस. डी. सावंत यांनी दिली.

कौशल्य प्रशिक्षण उपक्रमाविषयी विद्यापीठात कुलगुरु डॉ. सावंत यांच्या उपस्थिती करार झाला. यावेळी विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. सतीश नारखेडे यांच्यासह कौशल्य विकास उपक्रमाचे प्रतिनिधी जयप्रकाश कुलकर्णी उपस्थित होते. त्याचबरोबर विविध कृषी महाविद्यालयांचे प्राचार्य येथे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com