esakal | अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसमोर पेच! विद्यापीठांनी मागितले लेखी संमतीपत्र त्यानुसार...  
sakal

बोलून बातमी शोधा

students tension

संमती पत्रातील ठळक मुद्दे... 

  • शासनाच्या 19 जूनच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना संमती पत्र देणे बंधनकारक 
  • विद्यापीठाचा निर्णय मान्य असल्याबाबत पालकांशी विचाविनिमय करुन भरुन द्यावे संमतीपत्र 
  • आगामी परिणामास मी स्वत: जबाबदार असल्याचेही करावे लागणार नमूद 
  • परीक्षा द्यायची असल्यास ऑनलाइन की ऑफलाईन देणार, याचा करावा लागणार उल्लेख 
  • ऑफलाइन परीक्षा देताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचेही विद्यार्थ्यांकडून मागितले लेखी

अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसमोर पेच! विद्यापीठांनी मागितले लेखी संमतीपत्र त्यानुसार...  

sakal_logo
By
तात्या लांडगे

सोलापूर : अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करुन शासनाने त्यांना मागील परीक्षेतील गुणांच्या सरासरीवरुन ग्रेड देण्याचा निर्णय घेतला. तर हा निर्णय अमान्य असलेल्या विद्यार्थ्यांना अपग्रेडेशनची संधीही उपलब्ध करुन दिली. मात्र, आता अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संमतीपत्र देणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्यानुसार विद्यापीठाचा निर्णय मला मान्य असून मी पालकांशी विचारविनिमय करुन निर्णय घेतला आहे. तसेच आगामी परिणामास मी स्वत: जबाबदार असेन, असेही लेखी (ऑनलाइन) द्यावे लागणार असल्याने विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. 

राज्यातील सुमारे साडेआठ लाख विद्यार्थ्यांची परीक्षा ऑनलाइन तथा ऑफलाइन पध्दतीने घेणे सद्यपरिस्थितीत घेणे अशक्‍य असल्याने शासनाने सर्वच विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द केल्या. परीक्षा रद्द झाल्याने आनंदित झालेल्या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आता चिंता दिसू लागली आहे. शासनाच्या परीक्षा रद्दच्या निर्णयानुसार विद्यापीठ घेईल तो निर्णय मान्य असून मी घेतलेला निर्णय पालकांशी विचारविनिमय करुन घेतल्याचे विद्यार्थ्यांना लेखी द्यावे लागणार आहे. दुसरीकडे ज्या विद्यार्थ्यांना ग्रेड अमन्य असतील, त्यांनी ऑनलाइन की ऑफलाइन परीक्षा देणार, हेही लिहून द्यायचे आहे. मात्र, परीक्षा देताना स्वत:च्या आरोग्याची व सुरक्षिततेची काळजी स्वत: घेईन आणि उद्‌भवणाऱ्या परिस्थितीस स्वत: जबाबदार असल्याचेही लेखी द्यावे लागणार आहे. त्यामुळे पालकांची चिंता वाढली आहे. 

संमतीपत्र न देणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत विद्यापीठ घेईल स्वतंत्र निर्णय 
अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना संमतीपत्र बंधनकारकअंतिम वर्षातील सर्वच विद्यार्थ्यांना ऑनलाइन संमतीपत्र देणे बंधनकारक आहे. त्यानुसार त्यांनी विद्यापीठाचा कोणताही निर्णय मान्य असून मी घेतलेला निर्णय पालकांशी विचारविनिमय करुन घेतल्याचा उल्लेख करावा. तसेच ज्यांना ग्रेड अमान्य असतील, त्यांनी ऑफलाइन परीक्षा देताना स्वत:च्या आरोग्याची काळजी व होणाऱ्या परिणामास मी स्वत: जबाबदार असल्याचेही नमूद करावे. मात्र, जे विद्यार्थी संमतीपत्र देणार नाहीत, त्यांच्याबाबत विद्यापीठ स्वतंत्र निर्णय घेईल. 
- श्रेणिक शहा, परीक्षा नियंत्रक, पुण्यश्‍लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ 

संमती पत्रातील ठळक मुद्दे... 

  • शासनाच्या 19 जूनच्या निर्णयानुसार विद्यार्थ्यांना संमती पत्र देणे बंधनकारक 
  • विद्यापीठाचा निर्णय मान्य असल्याबाबत पालकांशी विचाविनिमय करुन भरुन द्यावे संमतीपत्र 
  • आगामी परिणामास मी स्वत: जबाबदार असल्याचेही करावे लागणार नमूद 
  • परीक्षा द्यायची असल्यास ऑनलाइन की ऑफलाईन देणार, याचा करावा लागणार उल्लेख 
  • ऑफलाइन परीक्षा देताना स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणार असल्याचेही विद्यार्थ्यांकडून मागितले लेखी