चुकीच्या धोरणांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला गळती : प्रकाश आंबेडकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच "वंचित'ची फाइट आहे,'' असे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता.28) येथे म्हटले आहे. 

औरंगाबाद - भ्रष्टाचार, चुकीच्या धोरणांमुळे कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचे लोक पक्ष सोडून जात आहेत. मात्र, आम्ही ऐऱ्या-गैऱ्यांना प्रवेश देणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर आमची ताकद वाढली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजप-शिवसेनेविरुद्धच "वंचित'ची फाइट आहे,'' असे प्रकाश आंबेडकर यांनी रविवारी (ता.28) येथे म्हटले आहे. 

येथे झालेल्या गोरबंजारा समाजाच्या मेळाव्यात ते बोलत होते. या वेळी मनसेचे एकमेव जिल्हा परिषद सदस्य विजय चव्हाण आणि माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांनी "वंचित'मध्ये  प्रवेश केला. 

कॉंग्रेसला वंचित बहुजन आघाडीसोबत विधानसभा लढवायची असेल तर आम्ही दिलेली 40 जागांची ऑफर आमचे 288 उमेदवार जाहीर करेपर्यंतच आहे, असे स्पष्ट करून आंबेडकर म्हणाले, ""सध्या राष्ट्रभक्तीचा केवळ देखावा सुरू आहे. पंतप्रधान म्हणाले होते की, पाकिस्तानला संपवू, त्यांना कोणी थांबवले?. गल्लीतील भांडणाप्रमाणे मोदी हूल देत आहेत. क्रिमिलेअरमुळे बंजारा समाजातील विद्यार्थ्यांवर अन्याय होत असून, सत्तेतील हिंदुत्ववादी पक्ष त्यांना न्याय देत नाहीत.'' 

""या देशात जे काही घडते आहे ते मोदींमुळेच, असा सध्या प्रचार सत्ताधारी करीत आहेत. ऊन, पाऊससुद्धा मोदींमुळेच पडतो, असे चित्र उभे केले जात आहे. मात्र, "लोकसभा तो झॉंकी थी, विधानसभा की पिक्‍चर अभी बाकी है,'' अशा शब्दांत खासदार इम्तियाज जलील यांनी सत्ताधाऱ्यांना इशारा दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The wrong policies of the Congress-NCP says Prakash Ambedkar