यशवंत जाधव प्रकरणी एकनाथ शिंदे म्हणाले, राजकीय सूडापोटी कारवाई नको

जे खरोखर भ्रष्ट आहेत त्यांची केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करा-एकनाथ शिंदे
Eknath Shinde
Eknath Shindetwitter

शिवसेना नेते बीएमसी स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव (Yashwant Jadhav Case) प्रकरणात आता वेगवेगळे मुद्दे समोर येत आहेत. यावर नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी महाविकास आघाडीवर (MahaVikas Aghadi) टीका केली आहे. जे खरोखर भ्रष्ट आहेत त्यांची केंद्रीय यंत्रणांनी चौकशी करावी अशी मागणी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. राज्यात सुरु असलेल्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या कारवाईबाबत त्यांनी भाष्य केलं आहे.

शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी मातोश्रीला दोन कोटी दिल्याचं वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिलं आहे. त्यासंदर्भात एकनाथ शिंदे म्हणाले, केंद्रीय तपास यंत्रणांनी खरोखर दोषी असतील, भ्रष्टाचारी असतील त्यांची जरुर चौकशी करावी. राजकीय सूड भावनेपोटी अशा प्रकारची कारवाई करणे योग्य नाही. लोकशाहीमध्ये हे बरोबर नाही असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

Eknath Shinde
'काश्मीर सोडा.. यशवंत जाधवांवर बोला', भातखळकरांचा राऊतांना टोला

शिवसेना नेते यशवंत जाधव प्रकरणात आयकर विभागाला काही महत्वाचे पुरावे सापडले. या तपासात त्यांना एक डायरीही सापडली ज्यात संशयास्पद नोंदी आढळून आल्या. या डायरीतील एका नोंदीमध्ये 'मातोश्री'ला ५० लाख रुपयांचे घड्याळ पाठवल्याचा उल्लेख आहे आणि दुसऱ्या नोंदीमध्ये गुढीपाडव्याला 'मातोश्री'ला २ कोटी रुपयांची भेट पाठवल्याचा उल्लेख आहे.याच प्रकरणावरून सध्या गदारेळ सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com