esakal | कर्नाटकच्या मंत्री पंढरपुरात उभारणार यात्री निवास; लवकरच होणार कामाला सुरुवात
sakal

बोलून बातमी शोधा

शशिकला जोल्ले

कर्नाटकच्या मंत्री पंढरपुरात उभारणार यात्री निवास

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

निपाणी : कर्नाटकातील भाविक, भक्तांसाठी राज्य सरकारकडून महाराष्ट्रातील पंढरपूर येथे यात्री निवास उभारले जाणार आहे. लवकरच दोन एकर जागेत कामाची सुरुवात करणार असल्याची माहिती धर्मादाय, वक्फ व हज मंत्री शशिकला जोल्ले यांनी ढोणेवाडी (ता. निपाणी) येथील कार्यक्रमात दिली.

मंत्री जोल्ले म्हणाल्या, दरवर्षी निपाणीसह सीमाभाग व कर्नाटकातून लाखो भाविक पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी जातात. आषाढ, चैत्र व माघ वारीत पंढपूरला जाणाऱ्या येथील भाविकांची संख्या मोठी आहे. पंढरपुरात विविध राज्यातील भाविक मोठ्या संख्येने दाखल होत असतात. कर्नाटकातील भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी यात्री निवास उभारले जाणार आहे. तेथे निवासासह अन्य मुलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न आहे.

आपल्या भागातील भाविकांसाठी पंढरपुरात यात्री निवास निर्माण करण्याचे आपले स्वप्न होते. त्यानुसार जवळपास दोन एकर जागेत यात्रीनिवास निर्मितीचा आराखडा आहे. हे केवळ आश्वासन नाही, तर लवकरच आपण स्वतः पंढरपुरला जाऊन यात्री निवास कामाचा प्रारंभ करणार आहोत.

हेही वाचा: कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा अभियंता

पहिल्या टप्प्यात पंढरपूरसह गुड्डापूर व श्रीशैल अशा तीन ठिकाणी यात्री निवासी उभारले जाणार आहेत. गुड्डापूर व श्रीशैल येथेही जाणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. या भाविकांच्या सोयीसाठी देखील यात्री निवास उभारले जाणार आहे. यावेळी ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

तिरुपती, अयोध्येत यात्री निवास

पंढरपूर, गुड्डापूर व श्रीशैल येथील यात्री निवासाचे काम सुरु झाल्यावर तिरुपती, अयोध्या येथेही कर्नाटकातील भाविकांसाठी यात्री निवास साकारण्याचे नियोजन असल्याचे मंत्री शशिकला जोल्ले यांनी सांगितले.

loading image
go to top