यवतमाळ काँग्रेसकडे, पण उमेदवार कोण?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 12 जानेवारी 2019

यवतमाळ : यवतमाळ लोकसभा मतदारसंघ जागावाटपामध्ये कॉंग्रेसकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाले असले, तरी या मतदारसंघात विजयाची खात्री असलेला उमेदवार कॉंग्रेसकडे नसल्याने पुन्हा विरोधकांचे पारडे जड झाल्याची चर्चा आहे. 

एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला राहिलेला यवतमाळ मतदारसंघ गटबाजीमुळे पोखरला गेला आहे. आता या जिल्ह्यात कॉंग्रेसचा एकही आमदार नाही. गेल्या 20 वर्षांपासून या मतदारसंघात कॉंग्रेसचा खासदार निवडून आलेला नाही. यामुळे हा मतदारसंघ राष्ट्रवादी कॉंग्रेसने घेण्याचा प्रयत्न चालविला होता. यासाठी "राष्ट्रवादी'चे नेते आमदार मनोहर नाईक व माजी मंत्री सुभाष ठाकरे यांनी "फिल्डिंग' लावली होती.

नाईक घराण्यातील एकाला उमेदवारी दिल्यास आघाडीला हा मतदारसंघ काबीज करण्याची नामी संधी होती. परंतु, जागा वाटपात ही जागा पुन्हा कॉंग्रेसकडे राहणार असल्याचे स्पष्ट झाल्याने कॉंग्रेसच्या गोटात आनंदाचे वातावरण असले तरी उमेदवार कोण? या मुद्यावर आनंदीआनंद आहे. 

यवतमाळ मतदारसंघातून निवडणुकीसाठी विधान परिषदेचे माजी उपसभापती माणिकराव ठाकरे उत्सुक आहेत. ठाकरे 1990 नंतर केव्हाही निवडून आलेले नाहीत. त्यांचे सुपुत्र राहुल ठाकरे यांच्या खांद्यावरही दोनवेळा पराभूत होण्याचा बिल्ला लागला आहे. ठाकरे पिता-पुत्रापैकी कुणाला उमेदवारी मिळाल्यास विरोधकांचा मार्ग बराचसा सोपा होईल, असे सांगितले जात आहे. 

याशिवाय माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांनी पुन्हा उमेदवारीचे घोंगडे बाहेर काढले आहे. आपण लोकसभेत व सुपुत्राला आर्णी मतदारसंघातून विधानसभेत पाठविण्याची मोघे यांची खेळी आहे. 

या पार्श्‍वभूमीवर कॉंग्रेसकडून नंदिनी पारवेकर या चांगल्या उमेदवार ठरू शकतात. पारवेकर या कॉंग्रेसचे युवा आमदार नीलेश पारवेकर यांच्या पत्नी आहेत. पारवेकर यांचे अपघाती निधन झाल्यानंतर कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सांत्वन करण्यासाठी यवतमाळला आले होते.

शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांचा सामना नंदिनी पारवेकर या समर्थपणे करू शकतील, असे मानले जाते. कारण जातीय राजकारणात पारवेकर यांच्याशी लढत देताना गवळी यांची चांगलीच दमछाक होईल, अशी शक्‍यता वर्तविली जाते. 

Web Title: Yavatmal to Congress but who is the candidate