Yavatmal Crime News: धक्कादायक! भर रस्त्यात नगरसेवकाची निर्घृण हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Yavatmal Crime News

Yavatmal Crime News: धक्कादायक! भर रस्त्यात नगरसेवकाची निर्घृण हत्या

Yavatmal Crime News: राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच भर रस्त्यात एका नगरसेवकाची निर्घृण हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे सर्वत्र एकच खळबळ माजली आहे. काल मध्यरात्री दरम्यान ही घटना घडली आहे. (yavatmal crime Murder of Nagar Panchayat corporator )

यवतमाळ येथील बाभूळगाव नगर पंचायत नगरसेवक अनिकेत गावंडे यांची धारधार शस्त्राने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. काल मध्यरात्री दरम्यानची ही घटना आहे. रेतीच्या पैशाच्या वादातून हत्या झाल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, बाभूळगाव नगर पंचायतचे नगरसेवक अनिकेत गावंडे यांची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात 2 संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. अनिकेतची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची होती.

त्यानंतर त्याने रेती व्यवसायात बाभूळगाव तालुक्यात पाय रोवले होते. नंतर प्रहारकडून नगरपंचायत निवडणूक लढून निवडून आला होता. अनिकेतच्या हत्येने बाभुळगावात खळबळ उडाली आहे.

रेती व्यवसायातून पैसे कमवल्यानंतर अनिकेतने राजकारणात प्रवेश केला होता. बाभूळगावात नगरपंचायत निवडणूक लढली. त्यात तो विजयी झाला. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धीही वाढले. पण, काल रात्री अचानक अनिकेतवर शस्त्राने वार करण्यात आले.

टॅग्स :crimemurder case