यंदा गणेशोत्सवानिमित्त गोवा, मुंबई, कोकणात जाण्यास "गुरुजीं'नी लावला ब्रेक

प्रदीप बोरावके 
Thursday, 6 August 2020

गोवा, मुंबई, कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेथील भाविक कोणी दीड दिवस, पाच दिवस तर कोणी सात दिवसांचा गणपती घरोघरी बसवितात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या देखील तेथे मोठी असते. तेथील भाविक "गुरुजीं'बद्दल मोठा आदर व आस्था बाळगून आहेत. त्यामुळे भाविक श्री गणेशाची प्रतिष्ठापना व दैनंदिन पूजा-अर्चा "गुरुजीं'कडून मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने करतात. गणपतीची प्रतिष्ठापना व दररोजच्या पूजेसाठी भरगच्च "दक्षिणा' तेथील भाविक गुरुजींना देतात. समाधानकारक दक्षिणा व मान मिळत असल्याने "गुरुजीं'चा तिकडे जाण्याचा नेहमीच ओघ राहतो. 

माळीनगर (सोलापूर) : गोवा, मुंबई व कोकणात गणरायाची प्रतिष्ठापना व पूजा-अर्चा करण्यासाठी पौरोहित्य करणाऱ्या "गुरुजीं'ची दरवर्षी वानवा भासते. त्यामुळे गणेशोत्सवात तेथे "गुरुजीं'ना वाढती मागणी असल्याने माळशिरससह राज्याच्या अनेक भागांतील "गुरुजी' तिकडे जात असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे "गुरुजीं'च्या तिकडे जाण्यास "ब्रेक' लागला आहे. 

हेही वाचा : लॉकडाउनने खाल्ल्या नोकऱ्या ! "या' पोर्टलवर अडीच लाख बेरोजगारांच्या उड्या 

गोवा, मुंबई, कोकणात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तेथील भाविक कोणी दीड दिवस, पाच दिवस तर कोणी सात दिवसांचा गणपती घरोघरी बसवितात. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची संख्या देखील तेथे मोठी असते. तेथील भाविक "गुरुजीं'बद्दल मोठा आदर व आस्था बाळगून आहेत. त्यामुळे भाविक श्री गणेशाची प्रतिष्ठापना व दैनंदिन पूजा-अर्चा "गुरुजीं'कडून मोठ्या श्रद्धेने व भक्तिभावाने करतात. गणपतीची प्रतिष्ठापना व दररोजच्या पूजेसाठी भरगच्च "दक्षिणा' तेथील भाविक गुरुजींना देतात. समाधानकारक दक्षिणा व मान मिळत असल्याने "गुरुजीं'चा तिकडे जाण्याचा नेहमीच ओघ राहतो. 

हेही वाचा : सोलापूरच्या पोराची यशोगाथा; नववीत "नापास'चा शिक्का, आता त्याच इयत्तेच्या पुस्तकात धडा ! 

गणेशोत्सव कालावधीत तेथील गणेशभक्तांकडून "गुरुजीं'च्या राहण्याची, जेवणाची सोय केली जाते. शिवाय येण्या-जाण्याचा खर्चही दिला जातो. त्यामुळे राज्यातील माळशिरस, पुणे, सातारा, पंढरपूर, नाशिक, कराड भागातील साधारण पाच हजारांवर गुरुजी दरवर्षी तिकडे धाव घेतात. मुंबईत तर गुजरातमधून गुरुजी गणेशोत्सवासाठी येतात. अल्पावधीत चांगली "कमाई' होत असल्याने गणेशोत्सवात राज्यातील "गुरुजीं'ची तिकडे जाण्याची ओढ अधिक असते. 

गणेशोत्सवाच्या दोन दिवस आधीच गुरुजी आपापल्या ठरलेल्या भागात दाखल होत असतात. मात्र, यंदा मुंबई, कोकणासह राज्यात कोरोनाचे गडद सावट आहे. कोरोनाची भीती, वाढता प्रादुर्भाव, एसटी बंद असल्याने प्रवासाची गैरसोय, तेथे गेल्यावर क्वारंटाइन होण्याची शक्‍यता, सरकारने गणेशोत्सवासाठी जारी केलेली नियमावली आदी कारणांमुळे यंदा "गुरुजीं'च्या तिकडे जाण्यास "ब्रेक' लागला आहे. तेथील भाविक गुरुजींना यंदा तिकडे येण्यासाठी फोनवरून साकडे घालत आहेत; मात्र उत्पन्नात मोठी घट होण्याची जाणीव असताना देखील गुरुजी कोरोनामुळे स्पष्ट नकार देत आहेत. 

माळीनगर येथील गुरुजी नितीन रामदसी म्हणतात, गणेशोत्सवात दरवर्षी मुंबईला जातो. यावर्षी भाविकांचे फोन येत आहेत. मात्र, कोरोनामुळे जाणे शक्‍य नाही. भाविकांना प्रतिष्ठापना व पूजेसाठी ऑनलाइन मार्गदर्शन करणार आहे. 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: This year Bhatji took a break because of Corona to go to Goa, Mumbai and Konkan for Ganeshotsav