राज्यात यंदा 13 कोटी झाडे 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 जून 2018

मुंबई : राज्यात 1 जुलै ते 31 जुलै 2018 या कालावधीत 13 कोटी वृक्षलागवड करणार असल्याची माहिती वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी दिली. राज्यात होणाऱ्या 13 कोटी वृक्षलागवडीच्या अनुषंगाने कोकण विभागाची आढावा बैठक यशंवतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित करण्यात आली होती. 

मुनगंटीवार पुढे म्हणाले, ""राज्यात 3 लाख 7 हजार 712 चौ. कि.मी.च्या भौगोलिक क्षेत्राच्या 33 टक्के म्हणजे जवळपास 1 लाख चौ. कि.मी.वर वनक्षेत्र आवश्‍यक आहे. मात्र, सध्या ते 62 हजार चौ. कि.मी. इतके आहे. अजून 38 हजार चौ कि.मी. वनक्षेत्र वाढवायचे आहे. पहिल्या वर्षी दोन कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाच्या बदल्यात राज्यात एकाच दिवशी 2 कोटी 83 लाख झाडे लागली, तर गेल्या वर्षी चार कोटी वृक्षलागवडीच्या संकल्पाच्या बदल्यात 5 कोटी 43 लाख वृक्ष राज्यात लागले. या दोन्ही वर्षांच्या वृक्षलागवडीची नोंद लिम्का बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये झाली.'' 

बैठकीत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यात होणाऱ्या वृक्षलागवडीच्या कामाच्या पूर्ततेचे सादरीकरण केले. कोकण विभागात सात जिल्ह्यांत मिळून 1 कोटी 41 लाख 13 हजार वृक्षलागवडीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. आतापर्यंत 96 लाखांहून अधिक खड्डे खोदून तयार झाले आहेत. विभागाची हरित सेनेची नोंदणी जवळपास 96 टक्‍क्‍यांहून अधिक आहे. मागील दोन वर्षांत लावलेल्या कोकण विभागातील जिवंत वृक्षांची सरासरी अनुक्रमे 77 आणि 83 टक्के इतकी आहे, अशी माहिती आज बैठकीत देण्यात आली. वन सचिव विकास खारगे यांनीदेखील या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन केले. 
 
Web Title: This year, there are 13 crore plants in the state