पुणे बोर्डासमोर पेच ! दहावी- बारावी परीक्षेच्या वेळापत्रकास शैक्षणिक सत्राचा तिढा

Students_20_20Copy_20_20Copy (2).jpg
Students_20_20Copy_20_20Copy (2).jpg

सोलापूर : बारावी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांचे परीक्षा अर्ज भरणे 15 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. डिसेंबरअखेर दहावीतील विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घेतले जाणार आहेत. एप्रिलअखेर परीक्षेला सुरवात होणार आहे. मात्र परीक्षेसाठी शैक्षणिक वर्ष सुरु झाल्यापासून 220 ते 240 दिवसांचे अध्यापन व्हायला हवे, तर कोरोनामुळे 25 टक्‍के अभ्यासक्रमही कमी केला आहे. दुसरीकडे शैक्षणिक वर्ष यंदा ऑनलाइन सुरु झाले असले तरीही शैक्षणिक सत्राची तारीख निश्‍चित झालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर 220 दिवस कधीपासून धरायचे, असा प्रश्‍न पुणे बोर्डाने शालेय शिक्षण विभागाला विचारला आहे. यामुळे नवा पेच निर्माण झाला आहे.

परीक्षेसाठी उपकेंद्रांची चाचणी
कोरोना संसर्गाची स्थिती आता सुधारू लागली असून, जानेवारीत कोरोनावरील लसही उपलब्ध होणार आहे. ऑनलाइन शिक्षण घेण्यास अडचणी असल्याने आता दहावी-बारावीची परीक्षा दरवर्षीप्रमाणेच घेण्याचे नियोजन सुरु असल्याची माहिती बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. दुसरीकडे परीक्षा केंद्र असलेल्या शाळांबरोबरच शहर-जिल्ह्यातील मोठ्या शाळांमध्ये परीक्षा घेता येतील का, याची चाचपणी सुरु आहे. त्यानुसार संबंधित शाळांमधील बेंचसह अन्य सोयी-सुविधांची माहिती संकलित केली जाणार असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.


राज्यात नववी ते बारावीपर्यंतच्या 22 हजार 204 शाळा असून, त्यामध्ये 56 लाख 48 हजार 28 मुले शिकत आहेत. 23 नोव्हेंबरपासून राज्यातील 11 हजार 410 शाळा सुरु झाल्या आहेत. नागपूर, नाशिक, मुंबईतील शाळा बंदच आहेत. आतापर्यंत सहा लाखांपर्यंत विद्यार्थी शाळेत उपस्थित राहत असून, अद्याप एकही विद्यार्थी कोरोनाबाधित आढळला नाही. या पार्श्‍वभूमीवर उर्वरित जिल्ह्यांमधील दहावी, बारावीचे वर्ग सुरु करण्याच्या दृष्टीने विशेष प्रयत्न केले जात आहेत. तत्पूर्वी, जूननंतर टीव्ही, आकाशवाणीसह ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला. मात्र, राज्यातील बहुतांश विद्यार्थ्यांना ऑनलाइन-ऑफलाईनही शिक्षण न मिळाल्याने शैक्षणिक सत्र केव्हापासून धरायचे? हा पेच शालेय शिक्षण विभागासमोर आहे. शालेय शिक्षणमंत्री, पुणे बोर्डाचे अध्यक्ष, सचिव, विभागीय संचालकांची बैठक घेऊन सत्र निश्‍चित केले जाणार आहे. त्यानंतरच पुणे बोर्ड दहावी-बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक निश्‍चित करणार आहे.

शैक्षणिक सत्र निश्‍चितीनंतर ठरेल वेळापत्रक
दहावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म भरण्याचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. त्यानंतर बारावीच्या विद्यार्थ्यांचेही अर्ज करण्याचे वेळापत्रक निश्‍चित केले जाईल. परंतु, शैक्षणिक सत्र निश्‍चित झाल्यानंतर परीक्षांचे वेळापत्रक अंतिम होईल.
-डॉ. अशोक भोसले, सचिव, पुणे बोर्ड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com