सातवी व नववीची पुस्तके यंदा बदलणार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 20 मार्च 2017

सोलापूर - राज्यात यंदाच्या शैक्षणिक वर्षापासून (जून 2017) इयत्ता सातवी व नववीची पुस्तके बदलून नवीन पुस्तके आणण्याचा निर्णय पाठ्यपुस्तक मंडळाने घेतला आहे. त्याचबरोबर पुढील शैक्षणिक वर्षापासून (जून 2018) इयत्ता आठवी व दहावीची पुस्तके बदलण्याची शक्‍यता आहे. महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम मंडळाने याबाबत प्रसिद्धिपत्रक काढून अभ्यासक्रम बदलाच्या सूचना शाळा, संस्था, पुस्तक विक्रेते यांना दिल्या आहेत. 

यावर्षी इयत्ता सातवी व नववीच्या वर्गाची सर्व पुस्तके नव्याने प्रकाशित करण्यात येणार आहेत. प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2012 सुधारित बदलाच्या अभ्यासक्रमानुसार इयत्ता तिसरीचा परिसर अभ्यास (जिल्हा भूगोल) व इयत्ता चौथी व पाचवीचा परिसर अभ्यास भाग एक व दोन ही पाठ्यपुस्तके पुढील वर्षीपासून (जून 2018) बदलणे अपेक्षित आहे. त्यामुळे या वर्गातील संबंधित जुन्या अभ्यासक्रमांच्या पुस्तकांचे यंदाचे शेवटचे वर्ष आहे. त्याचबरोबर पुढील वर्षी (जून 2018) आठवी व दहावीचा अभ्यासक्रम बदलणे अपेक्षित असल्यामुळे जुन्या अभ्यासक्रमाचे हे शेवटचे वर्ष राहण्याची शक्‍यता असल्याचेही पाठ्यपुस्तक मंडळाने काढलेल्या पत्रकात म्हटले आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांनी पुस्तके खरेदी करताना गरजेपुरतीच खरेदी करण्याचे आवाहनही त्यांच्याकडून केले आहे. 

Web Title: This year's seventh and ninth books change