२४ तारखेला लागणार दुसऱ्या टप्प्यातील ‘यिन’ निवडणुकीचा निकाल

तिसऱ्या टप्प्याचे मतदान २८ ला; शॅडो कॅबिनेटमधून काम करण्याची संधी
yin
yinsakal

Maharashtra News : ‘सकाळ माध्यम समूहा’च्‍या (Sakal Media Group) ‘यंग इन्‍स्‍पिरेटर्स नेटवर्क’ (YIN) तर्फे दुसऱ्या टप्प्यातील महाविद्यालयीन (College) प्रतिनिधी निवडणुकीसाठी उस्फूर्त मतदान झाले. राज्यभरातील ३६ जिल्ह्यांतील ४८५ महाविद्यालयांतून १,१४० उमेदवारांनी सहभाग नोंदवला. दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक निकालाची (Election Result) उत्सुकता शिगेला पोहोचलेली असून २४ डिसेंबरला निकाल जाहीर केला जाणार आहे.

पहिल्या टप्प्यात राज्यभरातील विविध महाविद्यालयांतील एक हजाराहून अधिक उमदेवार या निवडणूक रिंगणात सहभागी झाले होते. सर्वत्र मतदानाचा उत्साह पाहायला मिळाला. हाच उत्साह कायम ठेवत दुसऱ्या टप्प्यातील ऑनलाइन मतदान प्रक्रिया नुकतीच पार पडली. विद्यार्थ्यांनी आपल्‍या महाविद्यालयातील प्रतिनिधी निवडीसाठी मतदानाचा हक्‍क बजावला. महाविद्यालयीन प्रतिनिधींना शॅडो कॅबिनेटच्‍या माध्यमातून महाविद्यालय, जिल्ह्याचे प्रतिनिधित्व राज्‍य स्‍तरावर करण्याची संधी मिळणार आहे.

yin
ग्राहक करु शकणार आता थेट ऑनलाईन तक्रार

त्‍यामुळे उमेदवारांमध्ये विशेष उत्‍साह आहे. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना उमेदवारांनी आपला दृष्टिकोन त्‍यांच्‍यासमोर मांडला. दरम्‍यान मतदान प्रक्रिया खेळीमेळीच्‍या वातावरणात पार पडली. आता शुक्रवारी (ता.२४) मतमोजणीकडे लक्ष लागले आहे. राज्य ‘यिन’ निवडणूक टीमच्या माध्यमातून प्रत्येक मतदानाची पडताळणी सूचकपणे केली जाणार आहे. महाविद्यालयनिहाय मतमोजणी करत निकाल ऑनलाइन जाहीर केला जाणार आहे. उमेदवारांना हा निकाल ‘यिन ॲप’च्‍या माध्यमातून पाहता येईल.

ऑनलाइन निवडणुकीचे सर्वत्र कौतुक

आधुनिक यंत्रणेच्या माध्यमातून ‘यिन’ निवडणुकीसाठी विशेष ॲप तयार करण्यात आले. जगभरातील पहिली महाविद्यालयीन निवडणूक प्रक्रिया ‘यिन’ ॲपच्या माध्यमातून होत आहे. लोकशाही बळकटीसाठी आणि तरुणाईतील नेतृत्व विकसित करण्यासाठी ‘यिन’ची सक्षम निवडणूक यंत्रणा महिनाभरापासून काम करत आहे. काही ठिकाणी बोगस मतदान करण्याचा प्रयत्न केला. परंतु राज्य निवडणूक कमिटीने प्रत्येक मतदानाची पडताळणी करत सूचकपणे निकाल दिल. ‘यिन’च्या ऑनलाइन निवडणूक प्रक्रियेचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

yin
ओमिक्रॉन धोका वाढलाय; नाताळ साधेपणाने साजरा करा - पुणे महापालिका

‘यिन’ निवडणुकीचा तिसरा टप्पा

नाशिक, कोल्हापूर, नागपूर, पुणे, सांगली, सातारा वगळता राज्यभरातील सर्वच जिल्ह्यांतील उर्वरित महाविद्यालयांचे तिसऱ्या टप्प्यात २८ डिसेंबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज भरण्यासाठीची शेवटची तारीख २४ डिसेंबर आहे. आजच आपला उमेदवारी अर्ज दाखल करा. आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गूगल प्ले स्टोअरला भेट द्या आणि सकाळ माध्यम समूहाचे Young Inspirators Network ॲप डाऊनलोड करा, अन्यथा ‘यिन’ अधिकारी यांच्याशी संपर्क साधा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com