'यिन समर यूथ समिट'च्या तयारीसाठी युवा सज्ज 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 मे 2018

पुणे : डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या युवा व्यासपीठाने महाविद्यालयीन तरुणाईसाठी आयोजित केलेल्या 'यिन समर यूथ समिट'च्या तयारीसाठी राज्यातल्या 'यिन'च्या प्रतिनिधींचे इव्हेंट मॅनेजमेंट, सोशल मीडिया व होस्टिंग या विषयांवर एक शिबिर नुकतेच घेतले. 

पुणे : डिलिव्हरिंग चेंज फाउंडेशनच्या 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' (यिन) या युवा व्यासपीठाने महाविद्यालयीन तरुणाईसाठी आयोजित केलेल्या 'यिन समर यूथ समिट'च्या तयारीसाठी राज्यातल्या 'यिन'च्या प्रतिनिधींचे इव्हेंट मॅनेजमेंट, सोशल मीडिया व होस्टिंग या विषयांवर एक शिबिर नुकतेच घेतले. 

'यिन'च्या यंदाच्या युवा परिषदांना 16 मे रोजी मुंबईतून सुरवात होत आहे. त्यानंतर कोल्हापूर, सातारा, सोलापूर, पुणे, नागपूर, नाशिक, अकोला, नगर, औरंगाबाद, नांदेड आणि जळगाव येथील दहावीनंतरचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी या परिषदा होत आहेत. यासाठी स्पेक्‍ट्रम ऍकॅडमी मुख्य प्रायोजक आहे. पॉवर्ड बाय हॅशटॅग क्‍लोदिंग असणाऱ्या या समिटसाठी पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, सुहाना मसाले, अभि ग्रुप ऑफ कंपनीज हे सहप्रायोजक आहेत. 

विशेष कार्यशाळेत परिषदांच्या आयोजनात सहभागी होणाऱ्या सदस्यांच्या भूमिकांविषयी चर्चा झाल्या. 'यिन'चे मुख्य व्यवस्थापक तेजस गुजराथी यांनी इव्हेंट मॅनेजमेंट आणि शैलेश कुलकर्णी यांनी इव्हेंट होस्टिंगविषयी मार्गदर्शन केले. सोशल मीडिया या विषयावर डिजिटल मीडिया तज्ज्ञ समीर भुलाख यांनी ऑस्ट्रेलियातून 'यिन' सदस्यांशी संवाद साधला. या परिषदांच्या दृष्टीने सोशल मीडियाचे महत्त्व त्यांनी उलगडून सांगितले. 

तीन दिवसांच्या 'यिन समर यूथ समिट'मध्ये युवकांना उद्योग, राजकारण, टीम बिल्डिंग, स्टार्टअप, खेळ, नवीन तंत्रज्ञान क्षेत्रांमध्ये यशस्वी ठरलेल्या व्यक्तींबरोबर थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. त्याचबरोबर भविष्यातील शैक्षणिक संधींबद्दलही या परिषदांमध्ये चर्चा होणार आहे. 

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी आणि मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी 'यिन' युवा व्यासपीठाच्या 'यिन समर यूथ समिट'ला शुभेच्छा देणारे संदेश पाठविले आहेत. 

'सकाळ माध्यम समूहा'ने युवकांच्या माध्यमातून तीन वर्षांपूर्वी समाज परिवर्तनासाठी सुरू केलेले 'यिन'चे उपक्रम प्रशंसनीय आहेत. आजच्या तरुणाईसमोर शिक्षणापासून ते नोकरीपर्यंत; तसेच कौटुंबिक, सामाजिक अशा अनेक स्तरांवर आव्हाने आहेत. त्यांना सामोरे जाण्यासाठी युवकांना प्रशिक्षित करणे, प्रोत्साहन देणे, त्यांच्याशी संवाद साधणे महत्त्वाचे आहे.

'यिन'ने याच स्वरूपाचे जाळे महाराष्ट्रातील जिल्ह्याजिल्ह्यात विणले आहे आणि या चळवळीच्या माध्यमातून हे जाळे राज्यातील लाखो युवक-युवतींपर्यंत पोचले आहेत. यंदाही राज्यात 'समर यूथ समिट'चे तिसरे पर्व 'भविष्यातील शिक्षण' या विषयावर होत आहे. अत्यंत स्तुत्य असणाऱ्या, समाजाच्या आणि युवकांच्या विकासासाठी प्रयत्नशील असणाऱ्या 'यिन समर यूथ समिट'च्या उपक्रमास माझे विशेष सहकार्य असेल. नेतृत्व विकास कार्यक्रम आणि इतर उपक्रमांसाठी माझ्या शुभेच्छा! 
- नितीन गडकरी, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री 

'सकाळ माध्यम समूहा'चा 'यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क' हा उपक्रम कौतुकास पात्र आहे. मे आणि जून महिन्यांत 'यिन'च्या वतीने महाराष्ट्रात बारा ठिकाणी 'यिन समर यूथ समिट' होत आहेत हे ऐकून आनंद झाला. युवकांच्या सर्वांगीण विकासाचे एकंदर समाजाच्या सर्वांगीण विकासाशी थेट नाते आहे. दुसऱ्यांच्या आयुष्यात बदल घडवून आणायचे असतील, तर त्या बदलांची सुरवात स्वतःपासून व्हायला हवी. 'यिन समर यूथ समिट'सारख्या उपक्रमांमधून युवकांना निश्‍चितच योग्य दिशा मिळेल. 'यिन समर यूथ समिट'ला आणि अन्य सर्व उपक्रमांना माझ्या शुभेच्छा! 
- प्रकाश जावडेकर, केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री

Web Title: YIN Summer Youth meet starts on 16th May