"यिन' प्रतिनिधी निवडीची आजपासून प्रक्रिया सुरू

रॉयटर्स
शुक्रवार, 2 सप्टेंबर 2016

पुणे - महाविद्यालयीन तरुणाईतील बुद्धिमत्ता व सर्जनशीलतेला वाव देऊन त्यांच्यात नेतृत्वगुण तयार करणाऱ्या "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क‘च्या नेतृत्व विकास उपक्रमांतर्गत प्रतिनिधींची निवड प्रक्रिया 2 ते 4 सप्टेंबरदरम्यान पार पडणार आहे. पुणे व पिंपरी-चिंचवड शहरांमधील निवड प्रक्रियेला शुक्रवारपासून (ता. 2) सुरवात होणार आहे. 

"सकाळ माध्यम समूहा‘ने महाविद्यालयीन युवक-युवतींसाठी "यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क‘चे (यिन) व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. "यिन‘च्या याच व्यासपीठासाठी प्रतिनिधींच्या निवडीची महत्त्वपूर्ण प्रक्रिया या आठवड्यात होत आहे. त्यानुसार पुणे शहर, पिंपरी-चिंचवड व पुणे ग्रामीण या ठिकाणीही प्रक्रिया पार पडणार आहे. तिन्ही ठिकाणी असलेल्या माध्यमिक विद्यालयांसह महाविद्यालयांमध्ये निवडप्रक्रिया होणार आहे. सकाळपासून ते सायंकाळपर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. महाविद्यालयीन विद्यार्थी या निवड प्रक्रियेत मतदान करू शकणार आहेत. मतदान करताना महाविद्यालयाचे ओळखपत्र दाखविणे बंधनकारक आहे. या निवड प्रक्रियेस महाविद्यालयांमधून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. येत्या दोन दिवसांत चारशेपेक्षा जास्त उमेदवार या निवडप्रक्रियेत सहभागी होणार आहेत. या निवडीचा निकाल रविवारी (ता. 4) सकाळी 11 वाजता सकाळ इंटरनॅशनल लर्निंग सेंटर (एसआयएलसी) येथे जाहीर होणार आहे.

Web Title: #yinelection, #YIN, youth, sakal, pune

टॅग्स
व्हिडीओ गॅलरी