तरुण कलाकार म्हणताहेत "अच्छे दिन आ गये है...'

परशुराम कोकणे : सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 24 नोव्हेंबर 2016

सोलापूर - काळा पैसा बाहेर काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयावर दोन्ही बाजूने जोरदार चर्चा सुरू आहे. नोटाबंदीच्या निर्णयाला समर्थन दर्शवून देशाच्या हितासाठी नागरिकांनी काही दिवस त्रास सहन करावा, असे आवाहन करणारा "अच्छे दिन आ गये है...' हा माहितीपट सोलापुरातील तरुण कलाकारांनी बनविला आहे.

पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर अनेकजण नकारात्मक चर्चा करीत आहेत. काहीजण सोशल मीडियावर या निर्णयाला विरोध करीत आहेत, पण हा निर्णय देशहितासाठी किती महत्त्वाचा आहे हे या माहितीपटातून सांगण्यात आले आहे. कलाकारांच्या मते, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा बाहेर काढण्यासाठी घेतलेला निर्णय योग्यच आहे. नोटाबंदीमुळे सर्वसामान्यांचे नुकसान होणार नाही. काही दिवस त्रास सहन केल्यास नक्कीच अच्छे दिन येतील.'

सुरेश संभाळ यांनी या माहितीपटाचे दिग्दर्शन केले असून लेखन मनोज टोणपे यांनी केले आहे. चित्रण आणि संकलन सचिन जगताप यांनी केले आहे. कलाकार म्हणून मनोज टोणपे, अमृत ढगे, आकाश गोरे, अश्‍विनी इंगळे, श्‍वेता सवाईराम यांनी नोटाबंदीनंतर "अच्छे दिन' कसे येतील हे सांगितले आहे. हा माहितीपट यूट्यूबवर प्रसिद्ध करण्यात आला असून तो फेसबुक, व्हॉट्‌सऍपवर व्हायरल होत आहे.

नोटाबंदीच्या निर्णयामुळे लोकांना आता त्रास होत असला तरी काही दिवसांनी नक्कीच "अच्छे दिन' येतील. देशाच्या हितासमोर आपल्या अडचणी काहीच नाहीत असे आम्हाला वाटते. नकारात्मक मानसिकता दूर करण्याचा प्रयत्न आम्ही या माहितीपटातून केला आहे.

- श्‍वेता सवाईराम, कलाकार

Web Title: young artist saying acche din aa gye hai