बहुजन समाजातूनही तरुण नेतृत्व पुढे यावे -  महादेव जानकर

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

पुणे - आज प्रत्येक पक्षाने तरुण नेतृत्वाला राजकारणात संधी दिली आहे; मग बहुजन समाज त्यात मागे का? बहुजन समाजातूनही तरुण नेतृत्व निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी रविवारी व्यक्त केली. 

पुणे - आज प्रत्येक पक्षाने तरुण नेतृत्वाला राजकारणात संधी दिली आहे; मग बहुजन समाज त्यात मागे का? बहुजन समाजातूनही तरुण नेतृत्व निर्माण झाले पाहिजे, अशी अपेक्षा दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री महादेव जानकर यांनी रविवारी व्यक्त केली. 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती महोत्सवानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर्स पुणेने आयोजित केलेल्या कार्यक्रमात जानकर बोलत होते. खासदार अमर साबळे, महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अधीक्षक अभियंता एन. जी. वानखेडे, "बानाई'चे अध्यक्ष जी. एम. कंधारे, संस्थेचे अध्यक्ष पांडुरंग शेलार आदी या वेळी उपस्थित होते. कार्यक्रमात उज्ज्वला शेलार यांच्याकडून सफाई कामगार महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले. 

जानकर म्हणाले,""राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर आपण टीका न करता त्यांच्याकडून काहीतरी शिकावे. आंबेडकरवाद चांगला की गांधीवाद मोठा, यात पडण्यापेक्षा आपण संघटित व्हायला हवे.'' 

साबळे म्हणाले, ""डॉ. आंबेडकर हे खऱ्या अर्थाने समजून घेतले पाहिजे. समाज बदलासाठी त्यांचे विचारच महत्त्वाचे आहेत.''  वानखेडे यांनी मनोगत व्यक्त केले. 

मी भाजप किंवा कॉंग्रेसचाही नाही...तर मी स्वतःचा पक्ष निर्माण केला आहे. स्वतःच्या रस्त्यावर चालण्याचा आनंदच वेगळा असतो. 
- महादेव जानकर, दुग्धविकास व पशुसंवर्धनमंत्री 

Web Title: Young leadership should come forward from Bahujan Samaj Mahadev Jankar