
नेहरुंबद्दल 'ते' वक्तव्य करणाऱ्या तरूणानं मागितली माफी; काँग्रेस पदाधिकाऱ्याने Video केला ट्वीट
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सोशल मीडिया सेलचे जनरल सेक्रेटरी ऋषिकेश पाटील यांनी नुकतेच एक ट्वीट केलं आहे. या ट्वीटमध्ये त्यांनी पंडित नेहरू (Pandit Jawaharlal Nehru) यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या तरूणाने माफी मागितल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा तरुण मुंबईचा असून त्याला आम्ही शोधून काढला आहे. गांधी आणि नेहरुंबद्दल तसेच काँग्रेसविरोधात त्याचा ब्रेनवॉश केल्याचं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
ट्वीटमध्ये ऋषिकेश पाटील यांनी लिहीलं आहे की, “संघाचा अजून एक माफीवीर ... काही दिवसापूर्वी एका पोस्टवर या देवेंद्र ने नेहरूंबद्दल खूप गलिच्छ अशी कमेंट केली होती. हा मुंबई मधला आहे. याला मी माझ्या पध्द्तीने शोधला. गांधी नेहरूंवर तसेच काँग्रेस राष्ट्रवादी नेत्यांवर गलिच्छ पद्धतीने लिहिणारे किती ब्रेनवाॅश केलेले असतात."
हेही वाचा: महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्या बदनामी प्रकरणी अभिनेत्री पायल रोहतगीवर गुन्हा दाखल
या ट्वीटसोबत जोडलेल्या व्हिडीओमध्ये देवेंद्र चॅरिट नावाचा तरूण माफी मागताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये तो म्हणतो की, “ माझं नाव देवेंद्र चारिट आहे. दोन आठवड्यांपूर्वी मी पंडित जवाहरलाल नेहरूंविषयी एक पोस्ट केली होती की, पंडित जवाहरलाल नेहरू हे चमडीचोर होते आणि त्यांना लहान मुलं कशासाठी आवडायची ते...पण माझं हे वक्तव्य चुकीचं होतं. माझी चुकी मला मान्य आहे. महाराष्ट्र प्रदेश युवा काँग्रेसचे पदाधिकारी ऋषिकेश पाटील यांनी माझी चुक माझ्या लक्षात आणून दिली. मी समस्त भारतीयांची माफी मागतो. इथून पुढे कोणत्याही स्वातंत्र्यवीरांबद्दल किंवा कोणाबद्दलही अशी कमेंट करणार नाही.”
Web Title: Young Man Apologizes For Making Offensive Remarks About Nehru
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..