बलात्कार, हत्येप्रकरणी तरुणाला फाशीची शिक्षा 

बलात्कार, हत्येप्रकरणी तरुणाला फाशीची शिक्षा 

मुंबई - एका फिजिओथेरपिस्ट तरुणीवर (24) बलात्कार करून तीन वर्षांपूर्वी तिची हत्या झाली होती. सत्र न्यायालयाने या प्रकरणात देबाशिष धारा (27) याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली. 

मूळचा पश्‍चिम बंगालमधील असलेला धारा कामासाठी मुंबईला आला होता. विलेपार्ले येथे राहत असलेल्या या तरुणीच्या घराजवळच तो काम करायचा आणि तिला नेहमी पाहायचा. त्याने घरात घुसून तिच्यावर बलात्कार केला आणि जीन्सने गळा आवळून तिची हत्या केली, असा आरोप अभियोग पक्षाने ठेवला होता. या प्रकरणात त्याला दोषी ठरवून सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली. गरीब परिस्थिती असल्यामुळे कमी शिक्षा देण्याची मागणी त्याने केली होती. सत्र न्यायाधीश ए. डी. देव यांनी ही मागणी अमान्य केली. राज्य सरकारने मनोधैर्य योजनेंतर्गत मृत तरुणीच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत द्यावी, असा आदेशही सत्र न्यायालयाने दिला. या योजनेंतर्गत बलात्कारितेला दहा लाख रुपयांपर्यंत मदत देण्याची तरतूद आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com