'त्यापेक्षाही तु्म्ही जास्त नॉटी'; अमृता फडणवीसांची संजय राऊतांवर टीका

तुषार सोनवणे
Tuesday, 8 September 2020

कंगनाबाबत हरामखोर लडकी असा शब्दप्रयोग केला. परंतु त्याचे स्पष्टीकरण देतांना राऊत या शब्दाचा अर्थ त्यांनी नॉटी असा लावला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ने त्यांच्यावर टीका केली आहे

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौतने सुशांतसिंह मृत्यू प्रकरणानंतर अनेक भडक प्रतिक्रीया समाजमाध्यमांवर दिल्या. त्यात तीने मुंबई पोलिसांवरही टीका केली. तसेच मुंबई शहराची तुलना पाक व्याप्त काश्मिर सोबत केली. त्यामुळे खासदार संजय राऊत यांनी तिच्यावर कठोर टीका केली होती. परंतु राऊत यांनीही टीका करताना कंगनाबाबत 'हरामखोर लडकी' असा शब्दप्रयोग केला. परंतु त्याचे स्पष्टीकरण देतांना राऊत या शब्दाचा अर्थ त्यांनी नॉटी असा लावला. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस ने त्यांच्यावर टीका केली आहे

खासदार संजय राऊत यांनी एका वृत्त वाहिनीला कंगनाविषयी प्रतिक्रीया देताना तिला 'हरमाखोर लडकी' असे म्हटले होते. त्यामुळे त्यांच्यारही समाजमाध्यमातून टीका होताना दिसली होती. परंतु आपल्या वक्तव्याबाबत स्पष्टीकरण देताना ते म्हटले की, कंगना म्हणजे, नॉटी गर्ल', तसंच हरामखोर म्हणजे, मराठी भाषेत बेईमान असा होतो. ती नॉटी म्हणजेच, खट्याळ मुलगी असून ती बेईमान आहे. असं मला वाटतं'

रोखठोक संजय राऊतांवर शिवसेनेचा ठाम विश्वास; पुन्हा मुख्य प्रवक्तेपदी केली नेमणूक

कंगना आणि संजय राऊत यांच्यात सुरू असलेले वाक् युद्ध थांबता थांबत नाहीये. त्यात 'नॉटी गर्ल' या स्पष्टीकरणावरून, अमृता फडणवीसांनी राऊतांवर जोरदार टीका केली आहे. त्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये ते म्हणतात की, 'आम्ही विचार केला त्यापेक्षाही तुम्ही जास्त नॉटी निघालात' 

अमृता यांनी ट्वीट सोबतच #Naughty असाही हॅशटॅग वापरला आहे, त्यामुळे ट्वीटरवर हा हॅशटॅग ट्रेंड होताना दिसतोय. तसंच इतर समाजमाध्यामांवरही या हॅशटॅगसह नेटकरी व्यक्त होत आहेत. अमृता यांनी राऊतांवर केलेल्या टीकेनंतर शिवसेनेकडून काय प्रतिक्रीय येते यावर नेटकरी लक्ष ठेऊन आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Youre more naughty than that; Amrita Fadnavis criticizes Sanjay Raut