
राज्यातील 29000 गरीब कुटुंबांना 200 रुपये वाटत युवक काँग्रेसने दिला एका दिवसीय' अनुभव न्याय योजनेचा'
युवक काँग्रेसने गरिबांना दिला 'एक दिवसीय न्याय योजनेचा अनुभव; २९००० कुटुंबाना मदत
मुंबई : भारतरत्न राजीव गांधी यांच्या 29 व्या स्मृतिदिनानिमित्त राज्यातील 29 हजार गरीब व गरजू कुटुंबांना अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेसने आज 200 रुपये वाटत न्याय योजनेचा एक दिवसीय अनुभव दिला आहे. सोबतच न्याय योजना केंद्र सरकारने तातडीने लागू करावी, अशी मागणी देखील केली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
काँग्रेस पक्षाने 2019 च्या लोकसभा निवडणुकीत ‘न्याय’ योजनेचे आश्वासन दिले होते. वार्षिक उत्पन्न 1,44,000 पेक्षा कमी असलेल्या कुटूंबाना केंद्र शासनाकडून दरमहा 6000 रुपये, म्हणजेच 200 रूपये प्रतिदिन थेट खात्यात जमा होतील. कुटुंबातल्या महिलेच्या खात्यात ही रक्कम जमा होईल, जेणेकरून या पैशांचा दुरुपयोग होणार नाही अशी ही योजना होती. मात्र, केंद्रामध्ये कॉँग्रेसचे सरकार न आल्यामुळे न्याय योजनेची अंमलबजावणी होवू शकली नाही.
--------
पुलवामामध्ये दहशतवादी हल्ला; पोलिस हुतात्मा
--------
विमानप्रवासासाठी मार्गदर्शक सूची जाहीर; सेतू ऐपविषयी महत्वाची घोषणा
--------
दोन महिन्यानंतर दिल्ली पूर्वपदावर येण्याच्या मार्गावर
--------
चार दिवसांचा वर्कवीक करा; कंपन्यांना सल्ला
--------
सध्या कोरोनाच्या संकटामध्ये गरीबांची उपासमार होत असून अर्थव्यवस्था संकटात आहे. त्यामुळे गरिबांच्या बॅँक खात्यात जर महिना सहा हजार रूपये जमा केले तर त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न सुटेल. सोबतच बाजारातील मागणी आणि रोजगार वाढण्यास मदत होऊन अर्थव्यवस्थेला चालना मिळेल . त्यामुळे तातडीने 'न्याय' योजना गरीबांसाठी लागू करावी,अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश युवक कॉँग्रेस केंद्रातील मोदी सरकारकडे करत आहे,असे तांबे यांनी सांगितले.
Web Title: Youth Congress Distributed Rs 200 29000 Families One Day
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..