युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी मोदींच्या पोस्टरला काळे फासले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 11 ऑक्टोबर 2018

संगमनेर - इंधन दरवाढी विरोधात महाराष्ट्र युवक काँग्रेसच्या वतीने आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.यावेळी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी पेट्रोल पंपावरील पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या फोटोला काळे फासले. या आंदोलनातून इंधन दरवाढीच्या मुद्द्यावर युवक काँग्रेस आक्रमक झालेली दिसली. 

इंधन दरवाढीने होरपळलेल्या जनतेवर दरकपातीची तात्पुरती मलमपट्टी करण्याचे ढोंग आणण्यापेक्षा सरकारने पेट्रोल, डिझेल आणि गॅसचा जीएसटीमध्ये समावेश करावा आणि राज्य व केंद्राने लावलेले उपकर रद्द करून सामान्य जनतेला स्वस्त डिझेल, पेट्रोल आणि गॅस उपलब्ध करून द्यावे, यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

इंधन दरवाढीसंदर्भात आंतरराष्ट्रीय स्तरावरील दरवाढीचा जो संदर्भ भाजपकडून दिला जातो आहे, तो धादांत खोटा आहे. प्रत्यक्षात कॉंग्रेस सरकारच्या काळात कच्च्या तेलाचे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील दर 103 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत पोचले होते. 2010 ते 2014 या काळात हे दर 95 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत स्थिर होते. आज हेच दर 42 डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. याचा सरळ अर्थ अंतरराष्ट्रीय बाजारात इंधनाचे दर निम्म्याने घटले आहे. असे असतानाही सरकार सामान्यांची घोर फसवणूक करत आहे, असा आरोप युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांनी केला आहे.

Web Title: youth congress protest against fuel price hike