आत्महत्येच्या विळख्यात तारुण्य 

Youth getting suicide
Youth getting suicide

औरंगाबाद : वाढती स्पर्धा आणि धकाधकीच्या जीवनात उंचावलेल्या अपेक्षापूर्तीसाठी विद्यार्थी धडपडत आहेत. त्यातून येणारे अपयश, पालकांची भीती व निराशेच्या गर्तेतून दर पंचावन्नव्या मिनिटाला देशात सतरा वर्षांच्या आतील एक विद्यार्थी आत्महत्या करीत असल्याची बाब नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्यूरोच्या आकडेवारीतून स्पष्ट झाली. 

इयत्ता पहिलीपासूनच विद्यार्थ्यांवर अपेक्षांचे ओझे वाढत आहे. जीवघेणी स्पर्धा, अभ्यास आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पाहताना येणारे अपयश, त्यातून आलेली निराशा, पालकांचा झालेला हिरमोड आदी कारणांतून खचलेल्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. यातून आत्महत्येचा चुकीचा मार्ग विद्यार्थी जवळ करत आहेत. तरुणाईचीही अशीच अवस्था असून, शिक्षणाचा अवाढव्य खर्च, हाताला दर्जानुसार नसलेले काम, बेरोजगारी, ऐन तारुण्यातील व्यसन व चुकीची पकडलेली वाट या सर्व समस्यांतून आत्महत्येसारखा पळपुटा मार्ग शोधला जात आहे. 

दर तिसऱ्या मृत्यूमागे आत्महत्या 
नैसर्गिक, अपघातातील व आजारपणातील मृत्यूशिवाय देशात 15 ते 44 वयोगटातील दर तिसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण, तर देशातील 10 ते 24 वयोगटातील दर दुसऱ्या व्यक्तीच्या मृत्यूचे कारण आत्महत्या ठरते आहे. 
 
अपयश पचवणे, छोट्या कामातही आनंद शोधणे. "पॅनिक' होऊन जीवन संपविण्याचा विचार न करता, अचानक संकट, समस्या अपयश आल्यास त्यातून मार्ग शोधा, इतरांची मदत घ्या. मदत मागितल्यानंतर नक्कीच समस्यांतून वाट मिळते. आपल्या आयुष्याचा निर्णय एकट्याने घेणे चूक आहे. स्वत:वर प्रेम करा. बाह्य परिस्थितीवरून अपयश मोजण्यापेक्षा आंतरिक प्रेरणतूेन जीवनमार्ग सुकर करा. 
- डॉ. संदीप सिसोदे, अध्यक्ष, मानसोपचारतज्ज्ञ परिषद 

आत्महत्या 
- चाळीस सेकंदाला जगात एक आत्महत्या 
- दर 55 मिनिटाला देशात 17 वर्षांखालील एका विद्यार्थ्याची आत्महत्या 
- देशात 2015मध्ये महाराष्ट्रात (14.2 टक्के) सर्वांत जास्त आत्महत्या 
 
आत्महत्येची कारणे........कंसात आकडेवारी 
- कौटुंबिक समस्येतून (28.6) 
- शारीरिक व मानसिक आजार (15.8 टक्के) 
- विवाहासंबंधी समस्या (4.8 टक्के) 
- विविध कर्ज, व्यावसायिक अपयश (6.6) 
- व्यसनाधीनतेमुळे (2.7) 
- बेरोजगारीमुळे (2 टक्के) 
- विविध क्षेत्रांतील अपयश, छोटी कारणे (2 टक्के) 
- इतर कारणे (37.5) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com