युवा वॉरिअर्स पुरस्काराचे उद्या वितरण; पुण्यात रंगणार सोहळा

सकाळ वृत्तसेवा
Friday, 19 February 2021

राज्यभरातील सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, वैद्यकीय, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिलेदारांचा युवा वॉरिअर्स पुरस्कार देऊन, सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’कडून (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) येत्या शनिवारी (ता. २०) गौरव करण्यात येणार आहे.

पुणे - राज्यभरातील सामाजिक, राजकीय, सहकार, सांस्कृतिक, वैद्यकीय, कृषी व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिलेदारांचा युवा वॉरिअर्स पुरस्कार देऊन, सकाळ माध्यम समूहाच्या ‘यिन’कडून (यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क) येत्या शनिवारी (ता. २०) गौरव करण्यात येणार आहे. त्यात राज्यातील ३५ शिलेदारांचा समावेश असून, या युवा वॉरिअर्स पुरस्काराच्या निमित्ताने राज्यभरातील विविध क्षेत्रात काम करणारे शिलेदार ‘यिन’ने शोधले आहेत. कल्याणीनगरमध्ये आगाखान पॅलेस शेजारील हॉटेल हयातमध्ये शनिवारी सायंकाळी पाचला हा सोहळा होणार आहे. 

या शिलेदारांची शौर्यगाथा, कार्यगाथा युवा वॉरिअर्स अंक स्वरूपात असणार आहे. याप्रसंगी युवा वॉरिअर्स या विशेषांकाचे प्रकाशन व पुरस्कार वितरण प्रमुख पाहुणे व सकाळ माध्यम समूहाचे अध्यक्ष प्रतापराव पवार यांच्या हस्ते होणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आरोग्यमंत्री राजेश टोपे, सामाजिक न्याय व विशेष साह्य विभागाचे राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, उद्योग क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण होणार आहे. 

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून संकल्प ह्यूमन रिसोर्स डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे संस्थापक संचालक पी. एन. कदम, कामगार आयुक्त आणि उद्योग आणि आरोग्य सुरक्षाचे संचालक डॉ. महेंद्र कल्याणकर, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त कृष्ण प्रकाश, दिग्दशर्क अभिनेते प्रवीण तरडे, ‘सकाळ’चे संपादक- संचालक श्रीराम पवार, मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) उदय जाधव आदी उपस्थित राहणार आहेत.

रायगडचा डिस्कोथेक करून टाकला; संभाजीराजेंचा तीव्र संताप

या शिलेदारांना दिला जाणार ‘युवा वॉरिअर्स’ पुरस्कार
संध्या सचिन गाडेकर, अमोल दरेकर, डॉ. रवींद्र सपकाळ, राम शिंदे, डॉ. राज नगरकर, अनिकेत बनसोडे, प्रतीक दगडे, मयूर भांडे, शिवम बालवाडकर, सुजित थिटे, संमित शहा, ऋतुराज पाटील, दादू सलगर, रवींद्रनाथ माळी, प्रदीप गोरडे, अमर पाटील, सुवर्णा जोशी, मामीत चौगुले, निशांत भगत, गणेश  म्हात्रे, शिरीष घरत, देवेंद्र कांबळे, रवी बोडके, रोहित सरक, शिवराज मोटेगावकर, प्रणिता चिखलीकर, डॉ. एस. के. बिरादार, अंकुश सोनावणे, आशुतोष सांगोले, ज्ञानेश्वर बोगीर, गिरीश शर्मा, यासिफ यत्नाळ, सारंग तारे, ऋत्विज चव्हाण, अजिंक्य जोशी

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yuva Warriors Award Distribution in pune sohala